एम सी आर

यशवंत मध्ये इंग्रजी इंडक्शन प्रोग्राम यशस्वी संपन्न

Uncategorized

नांदेड:(दि. १२ ऑगस्ट २०२६)
यशवंत महाविद्यालयाल इंग्रजी विभागातर्फे नव्याने प्रवेशीत विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयातील विविध संधींची माहिती देण्याच्या उद्देशाने इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम भाषा प्रयोगशाळा, इंग्रजी विभाग येथे संपन्न झाला.
अध्यक्षस्थान माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी डॉ. ममता जोनेपल्लीवार , इंग्रजी विभाग, बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट या प्रमुख अतिथी होत्या.
कार्यक्रमाचा प्रारंभ सत्कार आणि स्वागतगीताने झाला. विद्यार्थिनींनी उत्कृष्ट स्वागतगीत गायनाने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर बी.ए. द्वितीय वर्ष इंग्रजी वर्गाच्या विद्यार्थिनींनी ‘नवे शैक्षणिक धोरण : संधी आणि मर्यादा’ या विषयावर, तर बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी मसिरा अंफल हिने बनविलेले ‘कवी आणि त्यांची सुवचने’ या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एल. व्ही. पद्माराणी राव यांनी प्रास्ताविकात विभागातर्फे आयोजित विविध उपक्रमांचा परिचय मान्यवरांना करून दिला.
‘इंग्रजी विषयातील करिअरच्या संधी’ या विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना डॉ. ममता जोनेपल्लीवार यांनी, इंग्रजी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले तसेच या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर उपलब्ध होणा-या पारंपरिक तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण होत असलेल्या नवीन‌ संधींची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. यात शिक्षण क्षेत्रातील पारंपरिक संधींबरोबर पत्रकारिता, वार्तांकन, अनुवाद व भाषांतरण, ब्लॉग आणि कंटेंट रायटिंग, टेक्निकल रायटिंग आणि ट्रान्सक्रिप्शन, इंटरप्रिटर किंवा कॉपी रायटर, तसेच प्रकाशन व्यवसायाशी संबंधित एडिटर, प्रुफ रीडर म्हणून काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते, याविषयी विस्ताराने माहिती दिली तसेच यातील बहुतांश संधी या आधुनिक प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील असल्याने विद्यार्थ्यांना फ्रीलान्सर किंवा वर्क फ्रॉम होम या प्रकारात काम करता येते; याकडे त्यांनी लक्ष वेधले. या सर्व संधींचा योग्य फायदा व्हावा; यासाठी इंग्रजी भाषेत पारंगत असणे आवश्यक आहे, यासाठी विद्यार्थ्यांनी इंग्रजीची भीती न बाळगता सकारात्मक आणि योग्य दिशेने प्रयत्न करावे, असा मोलाचा सल्ला डॉ. ममता जोनेपल्लीवार यांनी दिला.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, नवीन शैक्षणिक धोरण: २०२० अन्वये बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत विद्यार्थ्यांसमोर असणा-या संधी आणि आव्हानांकडे लक्ष वेधले. एक उपक्रमशील महाविद्यालय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या यशवंत महाविद्यालयात वेळोवेळी आयोजित होत असलेल्या उपक्रमांत सहभागी होत विद्यार्थ्यांनी उत्कर्ष साधावा, असे आवाहन केले.
सूत्रसंचालन मसिरा अंफल हिने केले तर आभार वसुंधरा रुईकर हिने मानले. कार्यक्रमास इंग्रजी विभागातील डॉ. स्वाती मदनवाड, डॉ. कैलाश इंगोले, डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ. माधव दुधाटे, प्रा.चैतन्य देशमुख आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, राजू अडबलवार, प्रशांत मुंगल यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती शारदा भवन हायस्कूल येथे उत्साहात साजरी भाषण व निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Chief Editor

मानवत येथील डॉ. राशी लड्डा हिचा नवा विश्वविक्रम

Chief Editor

विद्यार्थीप्रिय आदर्श प्राध्यापक: प्रा. डॉ. वसंत गुरव :

Chief Editor

कै सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन

Chief Editor

यशवंत’मधील संशोधक भारत कदम यांना पीएच.डी. प्राप्त

Chief Editor

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोज

Chief Editor

Leave a Comment