एम सी आर
Uncategorized

कै सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन

परभणी:

कै सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात महात्मा गांधी यांची स्मृतिदिन व हुतात्मा दिनानिमित्त गांधी विचार संस्कार परीक्षा 2026 यशस्वीपणे पार पडली. महिला महाविद्यालयात दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी महात्मा गांधी यांच्या 78 व्या स्मृतिदिनानिमित्त गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधीजींच्या जीवन मूल्यांची ओळख विद्यार्थिनींना व्हावी, गांधीजींचे विचार व कार्य विद्यार्थिनींना समजावेत या उद्देशाने 50 गुणांची परीक्षा घेण्यात आली. महाविद्यालयातील 62 विद्यार्थिनींनी या परीक्षेत सहभाग घेतला. या परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे सर यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयक म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. महेश जाधव यांनी काम पाहिले. या परीक्षेसाठीच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रवीण नादरे, डॉ. गणेश जाधव यांनी परीक्षा नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

Share

Related posts

अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी आत्महत्या हा पर्याय नाही; मदत मागा, आयुष्याला नवी दिशा द्या

Chief Editor

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन

Chief Editor

आरआरसी प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढविण्याची: डॉ. महेश मगर यांची मागणी

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठामध्ये महाड सत्यागृह शताब्दी व जयंती महोत्सव उत्साहात

Chief Editor

यशवंत ‘मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत विशेष व्याख्यान संपन्न

Chief Editor

उद्योजक व ध्यानसाधनेचे मिश्रण: सुरेश धूत (लेखक:डॉ. अजय गव्हाणे)

Chief Editor

Leave a Comment