एम सी आर

*शाश्वत विकासासाठी युवक – जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास शिबीराचे जग्गुनाईक तांडा येथे उद्घाटन संपन्न* ()

Uncategorized

नांदेड:
श्रीक्षेत्र माहूर येथील बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड शी संलग्नित असलेल्या श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीक्षेत्र माहूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शाश्वत विकासासाठी युवक – जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास या सात दिवसीय विशेष निवासी शिबीराचा उद्घाटन समारंभ आज दि. ०५ जानेवारी रोजी जग्गुनाईक तांडा येथे संपन्न झाला.
दररोज सकाळी ५ वाजेपासून या शिबीराची सुरूवात होणार असून, ६ते ०७ या वेळेत योगासन, ७ते ८ या वेळेत अल्पोपहार तर ८ ते १२ या वेळेत श्रमदान करण्यात येणार असून रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, प्रजनन आरोग्य, किशोरावस्था, ग्रामीण उद्योजकता, महिला आरोग्य, लोकसंख्या शिक्षण या सारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.
या शिबीराचे नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र.कुलगुरू डॉ. अशोक महाजन, विभागीय समन्वयक डॉ. अजय शिंदे, रासेयो चे राज्य संपर्क अधिकारी मिलिंद काळे, विद्यापीठाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड, जिल्हा समन्वयक डॉ. भागवत पस्तापुरे भेट देऊन स्वयंसेवकांच्या कार्याची पाहणी करणार आहेत.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ विलास पाटील हे होते तर गावचे सरपंच गणेश राठोड हे उद्घाटक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. राजेंद्र लोणे, उपसरपंच विनायक बेहेरे, ग्रा.पं.सदस्य संतोष नाईक, कृ. उ.बाजार समितीचे सदस्य बंडू जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव, ग्रामसेवक गादेकर, मुख्याध्यापक जगताप, पंचशील विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड, तुकाराम नाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो प्रमुख डॉ. अभिजित कांडलीकर यांनी सूत्रसंचालन प्रा. कृष्णा दुगाळे यांनी तर उपस्थितांचे आभार रासेयो सहायक डॉ. अवधूत लांडे यांनी व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड व सचिव सौ संध्याताई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी परिश्रम घेतांना दिसून आले.

Share

Related posts

यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचे उत्साह आणि थाटात उद्घाटन संपन्न

Chief Editor

अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी आत्महत्या हा पर्याय नाही; मदत मागा, आयुष्याला नवी दिशा द्या

Chief Editor

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल होतील. – प्राचार्य डॉ. रजनी शिखरे

Chief Editor

बारावीनंतर करिअरची नवी दिशा; स्वावलंबी होण्यासाठी विद्यापीठाची सुवर्णसंधी

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ: भूशास्त्र संकुलाच्या विद्यार्थ्यांची भरारी;स्पर्धा परीक्षा व संशोधन क्षेत्रात यशाचा डंका

Chief Editor

यशवंत ‘मध्ये ग्रंथालय सुविधांवर कार्यशाळा संपन्न*

Chief Editor

Leave a Comment