एम सी आर
Uncategorized

यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचे उत्साह आणि थाटात उद्घाटन संपन्न

*
नांदेड:( दि.२४ फेब्रुवारी २०२६)
यशवंत महाविद्यालयातील यशवंत वार्षिक युवक महोत्सव:२०२६ चे उपविभागीय अधिकारी, नांदेड येथील डॉ.सचिन खल्लाळ यांच्या शुभहस्ते दि.२३ फेब्रुवारी रोजी उत्साहात आणि थाटात उद्घाटन संपन्न झाले. सोहळ्याचा प्रारंभ राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि आधुनिक भगीरथ श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने झाला.
उद्घाटकीय मनोगतात डॉ. सचिन खल्लाळ यांनी, ‘विकसित भारत २०२७: युवकांची भूमिका’ हा स्पर्धेचा विषय युवामनाला उभारी देणारा आहे. प्रत्येक माणसाला आयुष्याचा अर्थ काय, आयुष्याची सार्थकता काय, असे प्रश्न पडले पाहिजेत; त्यातूनच आत्मशोधाचा प्रारंभ होतो. २०४७ मधील विकसित भारत हा युवकांच्या खांद्यावर आधारित असेल. विविध क्षेत्रात युवावर्गातील प्रत्येक जण प्रतिनिधित्व करेल. तरुणांनी तंत्रज्ञानाची सकारात्मक बाजू लक्षात घेऊन मोबाईलचा संतुलित वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी प्रास्ताविकात माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, २८ फेब्रुवारी रोजी संपन्न होणारे सायन्स डे डोळ्यासमोर ठेवून युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन दृष्टी निर्माण करण्याचा हेतू विविध स्पर्धांमागे आहे. मराठवाड्यातील विद्यार्थी संशोधनांमध्ये अव्वल व सरस ठरावेत. ज्ञान ही एक अर्थसत्ता असते. कौशल्याच्या सहाय्याने राष्ट्राला सामाजिक-आर्थिक विकास शक्य आहे, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोपात श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर म्हणाले की, युवक महोत्सवातील विविध उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी आणि भवितव्य घडविण्यासाठी उपयुक्त असतात. विद्वान व्यक्तीला जगात सर्वत्र महत्त्व प्राप्त होत असते. देशामधील ज्ञानसत्ता वृद्धिंगत करणे; हे तरुणांचे कर्तव्य आहे. भारत विकसित राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे; त्यासाठी युवकांमध्ये धैर्य, कौशल्य आणि जाज्वल्यता याची आवश्यकता आहे.
याप्रसंगी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, युवक महोत्सव समन्वयक डॉ.नीरज पांडे, डॉ.विश्वाधार देशमुख यांची उपस्थिती होती.
सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय कु.गोदावरी कानशुक्ले यांनी करून दिला तर शेवटी आभार डॉ. नीरज पांडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, डॉ.वनदेव बोरकर, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.संजय जगताप, प्रबंधक संदीप पाटील, शुभम राठोड, आयुष सोनकांबळे आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share

Related posts

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींना वैमानिक होण्यासाठी “गिविंग विंग्स टू फ्लाई “उपक्रम.

Chief Editor

दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची यशोगाथा; पोलिस भरतीत दोन विद्यार्थिनींची निवड

Chief Editor

यशवंत वार्षिक युवक महोत्सव अंतर्गत पेपर सादरीकरण स्पर्धा संपन्न

Chief Editor

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विजयी*

Chief Editor

प्रो. राजाराम माने यांच्या संशोधन टीमच्या ‘विषारी वायू शोधक’ उपकरणाला केंद्र सरकारचे पेटंट

Chief Editor

Leave a Comment