एम सी आर
Uncategorized

लोकशाही आणि जातीव्यवस्था एकत्र नांदू शकत नाहीत -डॉ.अजय गव्हाणे

नांदेड:( दि. ४ फेब्रुवारी २०२६)
भारतीय संविधानाने ‘एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’ हे तत्त्व प्रस्थापित केलेले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना करण्यासाठी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवता हे तत्व आचरणात व व्यवहारात येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते. आधुनिक युगात लोकशाही व्यवस्था ही क्रांती असून मतदानाद्वारे शासनाच्या स्थापनेमध्ये प्रत्येक मतदाराला सहभागी होता येते; मात्र मतदान जात, धर्म, भाषा, वर्ण, वंश, रंग, इत्यादी विषमतेच्या आधारावर न करता ‘प्रथमतः मी भारतीय आहे आणि अंतिमतः मी भारतीयच आहे’ हे तत्व समोर ठेवून करावे. लोकशाही आणि जातीव्यवस्था एकत्र नांदू शकत नाहीत, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी केले.
श्री. गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय, पूर्णा येथील राज्यशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित ऑनलाइन वेबिनारमध्ये ‘मतदान देशासाठी! लोकशाहीला प्रबळ करण्यासाठी’ या विषयावर दि.३ फेब्रुवारी रोजी ते बोलत होते.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. के.राजकुमार म्हणाले की, प्रत्येक उपक्रमाचा हेतू प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे तरच लोकशाही व्यवस्था प्रबळ होईल. संस्थेचे सचिव श्री. अमृतराज कदम यांनी, मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. शहरी भागात कमी मतदान आणि ग्रामीण भागात जास्त मतदान दिसून येत असल्याचे निरीक्षणही नोंदविले. येणाऱ्या निवडणुकीत मतदान जागृतीचा फायदा झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागातील डॉ.ओंकार चिंचोले यांनी केले तर आभार डॉ.मनीषा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे, डॉ. गजानन कुरुंदकर, डॉ.संजय दळवी आणि डॉ. रवींद्र राख, डॉ.विनोद कदम यांनी परिश्रम घेतले आणि यशवंत महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक गजानन पाटील यांनी सहकार्य केले. वेबिनारसाठी डॉ.गंगाधर कापुरे, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share

Related posts

महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव पदी शिवा कांबळे यांची निवड

Chief Editor

नांदेड महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्र. 10 (अ) मधून ॲड.ज्ञानेश्वर रामलिंग धडके यांचा सर्वांगीण विकासाचा निर्धार

Chief Editor

निवडणूक अधिकारी, कर्मचारी याचे पहिले प्रशिक्षण संपन्न

Chief Editor

अविष्कार स्पर्धेसाठी पोस्टर व पोडियम प्रस्तुतीकरण कौशल्यावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

Chief Editor

सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी

Chief Editor

नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर संगीतम कवायतीचे संचलन

Chief Editor

Leave a Comment