एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मधील डॉ.मदन अंभोरे यांना ६० लक्ष रुपये बृहद संशोधन प्रकल्प प्राप्त

यशवंत ‘ मधील डॉ.मदन अंभोरे यांना ६० लक्ष रुपये बृहद संशोधन प्रकल्प प्राप्त

नांदेड:( दि.१८ एप्रिल २०२६)

                श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील डॉ.मदन अंभोरे यांना भारत सरकारच्या अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेतर्फे ६० लक्ष रुपयांचा बृहद संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे.
               यशवंत महाविद्यालयाच्या उज्वल व देदीप्यमान यशामध्ये तसेच शिरपेचामध्ये डॉ.मदन अंभोरे यांच्या बृहद प्रकल्पाच्या रूपाने आणखीन एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.
               या उल्लेखनीय, दुर्मिळ व सर्वोत्तम यशाबद्दल माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.ए. बशीर, डॉ. विजय भोसले, डॉ. शिवराज शिरसाट, डॉ.सुभाष जुन्ने, डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ.संदीप खानसोळे, डॉ. कविता केंद्रे, डॉ.डी.एस. कवळे, डॉ.शांतुलाल मावसकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समनयीका डॉ. एल. व्ही.पदमाराणी राव, डॉ.साहेब शिंदे, प्रा. माधव दुधाटे, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, प्रा.नारायण गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी व महाविद्यालयातील विभागप्रमुख प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथालयीन कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.यशवंत ‘ मधील डॉ.मदन अंभोरे यांना ६० लक्ष रुपये बृहद संशोधन प्रकल्प प्राप्त*
Share

Related posts

किस्ना’ : स्त्रीमनाचा संवेदनशील वेध घेणारा कथासंग्रह

Chief Editor

वटसावित्री पौर्णिमा उत्साहात; महिलांनी पतीच्या दीर्घायुष्य व कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी केले व्रत

Chief Editor

नेसुबो महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Chief Editor

नांदेड SBI सोनेतारण घोटाळ्यातील मुख्य आरोपी आदित्य सेनगावकरचा राजस्थानमध्ये गूढ मृत्यू

Chief Editor

स्वामी विवेकानंद संकुलात रक्तदान शिबिराचे आयोजन

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

Chief Editor

Leave a Comment