एम सी आर
Uncategorized

प्राचार्य बाबाराव नरवाडे, शंकर नरवाडे यांना मातृशोक रेणुकाबाई सटवाजी नरवाडे खुरगावकर यांचे वृद्धापकाळाने निधन

उद्या दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता मूळ गावी खुरगाव येथे संस्कार

नांदेड, (प्रतिनिधी)-नांदेडच्या तथागतनगर जवळच्या पालीनगर मधील ज्येष्ठ नागरिक रेणुकाबाई सटवाजी नरवाडे खुरगावकर यांचे आज संध्याकाळी ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०५ वर्षाच्या होत्या. महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वाघाळा येथील सेवानिवृत्त प्राचार्य बाबाराव नरवाडे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया मधील कॅशियर शंकर नरवाडे यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत रेणुकाबाई सटवाजी नरवाडे यांच्या पश्चात दोन मुले, सुना, चार मुली, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. दिवंगत रेणुकाबाई सटवाजी नरवाडे खुरगावकर यांच्या पार्थिवावर उद्या दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता मौजे खुरगाव येथील मूळ गावच्या स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तथागतनगर जवळील पालीनगर येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

Share

Related posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा

Chief Editor

जलतरण म्हणजे आरोग्याचा सर्वोत्कृष्ट मूलमंत्र -माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत

Chief Editor

सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ मनोहर चासकर

Chief Editor

नांदेड जिल्ह्याचा किकबॉक्सिंगमध्ये दबदबा; २३ खेळाडू राज्यस्तरासाठी पात्र

Chief Editor

युवक हा राष्ट्र क्रांति घडवून आणणारा बलवान हत्यार:मा.श्री.नारायण चौधरी”

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

Chief Editor

Leave a Comment