एम सी आर

योग ही विज्ञाननिष्ठ संकल्पना -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे

Uncategorized

नांदेड:( दि.२१ जून २०२६)
भारताने विश्वाला दिलेली देणगी म्हणजे योग होय. योग ही विज्ञाननिष्ठ संकल्पना असून स्वतःचा स्वतःकडे होणारा प्रवास म्हणजे योग आहे. माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा संबंध योगाशी असल्यामुळे निश्चितच ही विज्ञाननिष्ठ बाब असल्याचे प्रतिपादन माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी केले.

बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा, राष्ट्रीय छात्र सेना आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित योग प्रात्यक्षिकाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते.
योग प्रशिक्षक डॉ.रुद्रावती चव्हाण व डॉ.माधव पुयड यांनी भद्रासन, वज्रासन, ताडासन, प्राणायाम, क्षुलभासन आदी विविध योग प्रयोगाचे प्रात्यक्षिक उपस्थित वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून करवून घेतले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, डॉ.रत्नमाला म्हस्के, डॉ.मनोज पैंजणे, प्रा.उत्तम केंद्रे, प्रा.राहुल टिचकुले यांनी परिश्रम घेतले तसेच डॉ.अजय गव्हाणे, संदीप पाटील, कालिदास बिरादार, गजानन पाटील यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रा.कैलास डाड, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. संजय ननवरे, डॉ. शिवराज बोकडे, डॉ. संजय जगताप, डॉ.संदीप खानसोळे, डॉ. प्रवीण तामसेकर, प्रा.ओमप्रकाश गुंजकर, प्रा.अभिनंदन इंगोले, डॉ. मदन अंभोरे, डॉ.माधव दुधाटे, डॉ.कैलास इंगोले, डॉ. धनराज भुरे, डॉ.दत्ता कवळे, डॉ.योगेश नकाते, डॉ. अजय मुठे, प्रा.फाजगे, कालिदास बिरादार आदींची उपस्थिती होती.
Share

Related posts

यशवंत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील वाहतूक कोंडीचा प्रश्न; पोलिसांकडे वाहतूक नियमनाची मागणी

Chief Editor

तरुणाई स्वतःचा शोध युवक महोत्सवातून घेतात -माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत

Chief Editor

लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणेला नवी दिशा

Chief Editor

जिजाऊंच्या संस्काराचा वसा आणि वारसा आजच्या मुलींनी घ्यावा : सुभाष ढगे

Chief Editor

डिजिटल युगात हिंदीतून रोजगाराच्या अमर्याद संधी -डॉ. कोमलकुमार परदेशी

Chief Editor

महात्मा फुले यांचे क्रांतिकारकत्व:-डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

Leave a Comment