एम सी आर
Uncategorized

जिजाऊंच्या संस्काराचा वसा आणि वारसा आजच्या मुलींनी घ्यावा : सुभाष ढगे

परभणी: प्रतिनिधी
कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालया मध्ये दिनांक 12 जानेवारी जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती दिवशी साजरी करून
सावित्री जिजाऊ सप्ताहाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या राजमाता जिजाऊ स्त्री अभ्यास केंद्राकडून सुभाष ढगे यांचे आम्ही जिजाऊ च्या लेकी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. जिजाऊनी राष्ट्र निर्मितीचे धडे शिवबा ला दिले. आज प्रत्येक मुलीने जिजाऊचा आदर्श घ्यावा. याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या संचालक मा.सौ. दिपलक्ष्मीताई जामकर यांची उपस्थिती होती. तर याप्रसंगी प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आजच्या आधूनिक काळात संयुक्त कुटूंब पध्दतीचे जामकर परिवाराचा हे एक आदर्श उदाहरण आहे. असे मत आपल्या अध्यक्ष समारोपात व्यक्त केले. बी. ए. प्रथम वर्षाच्या रुपाली जाधव व शुभांगी सरकटे व मनीषा राउत यांनी विश्व हिंदी दिनानिमित्त तयार केलेला हस्तलिखत अंकाचे विमोचन या प्रसंगी मान्यवरंच्या हस्ते करण्यात आले. या सप्ताहामध्ये सावित्रीबाई फुले एकांकीका, निबंध लेखन स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा इ चे यशस्वी आयोजन संपन्न होण्याकरिता राजमाता जिजाऊ स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. संगीता लोमटे सदस्य डॉ.नसिम बेगम व समाजशास्त्र विभागाचे प्रा. परमेश्वर यादव यांनी योगदान दिले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थीनी व सर्व विभागातील प्राधापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related posts

ज्योतिरादित्या मुठ्ठे ची राज्यस्तरीय किंकबॉक्सिंग स्पर्धेत दोन रौप्य पदकांना गवसंनी

Chief Editor

कै सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन

Chief Editor

यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

डॉ. महेश मगर यांच्या पाठपुराव्याला यश; आरआरसी प्रस्ताव सादरीकरणासाठी २० जूनपर्यंत मुदतवाढ

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी व्यासपीठ – कुलसचिव डॉ. डी. डी. पवार

Chief Editor

लेखन संस्कृतीला चालना देण्यासाठी श्री शारदा भवन हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा

Chief Editor

Leave a Comment