एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठाच्या वतीने शिवराम लुटे यांचा सत्कार

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., नांदेडच्या संचालकपदी शिवराम लुटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आज (दि.२९ जुलै) त्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते शिवराम लुटे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कुलगुरूंनी त्यांचे अभिनंदन करत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरील भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
शिवराम लुटे हे विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक असून, सध्या ते पतसंस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी एका कार्यकाळात पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वीपणे नेतृत्व केले आहे. पतसंस्थेच्या जडणघडणीत, विकासात आणि आर्थिक बळकटीसाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड झाली असून, ही त्यांच्या कार्याचा योग्य गौरव असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या सत्कार समारंभास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, डॉ.पराग खडके, डॉ.चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड, दूरस्थ शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रकाश निहलानी, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. कुलसचिव डॉ. रामदास पेद्देवाड, पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद हंबर्डे, सचिव संजयसिंह ठाकूर, उपाध्यक्ष काळबा हनवते, कोष्याध्य्क्ष अभय जोशी, संचालक तुकाराम हंबर्डे, बालाजी शिंदे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————–

Share

Related posts

यशवंत ‘द्वारे शोधचक्र पोर्टलवर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

नेसुबो महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी निवड

Chief Editor

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा

Chief Editor

बहुव्यापी व बहुआयामी: डॉ. हरिश्चंद्र पतंगे (लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

यशवंत ‘ भारत एन्व्हॉर्मेंट प्रोग्रामद्वारे राष्ट्रस्तरीय प्लॅटिनम गोल्ड पारितोषिकाने सन्मानित

Chief Editor

भगवान रजनीश संबोधी दिनी सक्रिय ध्यान अभियान समारोप सोहळा

Chief Editor

Leave a Comment