एम सी आर
Uncategorized

जलतरण म्हणजे आरोग्याचा सर्वोत्कृष्ट मूलमंत्र -माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत

L
नांदेड:( दि.१७ मार्च २०२६)
मानवी आरोग्याचा सर्वोत्कृष्ट मूलमंत्र म्हणजे जलतरण आहे. यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांचे राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेतील यश अभिनंदनिय आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री.डी.पी. सावंत यांनी व्यक्त केले.
प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांनी दि. १५ मार्च रोजी श्री. शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय महास्विम चॅम्पियन जलतरण स्पर्धेत तीन सुवर्णपदक आणि दोन कांस्यपदक प्राप्त केले.
या सुयशाबद्दल महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत यांच्या हस्ते प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर यांची उपस्थिती होती.
या सुयशाबद्दल माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, पर्यवेक्षिका प्रा.वंदना बदने, डॉ.मनोज पैंजणे, प्रा.राहुल टीचकुले, प्रा.उत्तम केंद्रे, डॉ. एम.एम. व्ही. बेग, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ.रामराज गावंडे, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.एकनाथ मिरकुटे, प्रा. सचिन अपस्तंभ, प्रा.नरेंद्र कंचटवार, डॉ. बी. जी. देशमुख, डॉ. मुकेश धर्मले, प्रा. एम. एस. कुलकर्णी, प्रा.एस.डी.बोखारे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, किशोरसिंह ठाकुर ज्ञानेश्वर डोंगरे, जगन्नाथ महामुने, सेवानिवृत्त वनाधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर, बालाजी गाडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

शेतात खत, घरात एकमत आणि गावात पत निर्माण करणारी रेशीम शेती करावी – जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे

Chief Editor

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांनी केली -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनांसाठी २१ ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवातील बोधचिन्ह स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

मालमत्तेच्या वादातून जीवघेणा हल्ला; पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

Chief Editor

Leave a Comment