एम सी आर

नांदेड-किनवट मार्गावर भीषण अपघात : कार–दुचाकी समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

Uncategorized

नांदेड:डॉ. भगवान सूर्यवंशी.
हिमायतनगर –नांदेड ते किनवट मार्गावरील पवना पाटीच्या पुढे गुरुवारी (दि. १९) दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, दुचाकी (एमएच २६ – बीएम ८८९४) व कार (एमएच २६ – सीपी ५०८०) यांच्यात पवना पाटीपासून काही अंतरावर समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी चालक गजानन लक्ष्मण पांचाळ (वय ३५) राहणार सरसम यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सहप्रवासी शंकर पंडीतराव सर्जे देशमुख राहणार सरसम हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना नांदेड येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस पाटील माधव नखाडे यांनी दिली.

अपघातग्रस्त कार तलाठी प्रकाश लक्ष्मण तोटेवाड यांची असून अपघात झाला तेव्हा ते स्वतः वाहन चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच जमादार नवाबखान पठाण व आवूलवार यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच माजी आमदार माधवराव पाटील जवळगावर यांनी घटनास्थळी भेट देत पोलीस निरीक्षक भगत यांना बोलावून पंचनामा सुरू केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

Share

Related posts

कै.‌सौ.‌ कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील वाड्मय मंडळाच्या वतीने कमल वार्षिकांक विमोचन

Chief Editor

विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

Chief Editor

नांदेड जिल्हा रेशीम हब बनविणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले*

Chief Editor

सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठामध्ये महाड सत्यागृह शताब्दी व जयंती महोत्सव उत्साहात

Chief Editor

उद्या ‘हिंद-दी -चादर’ ६० कलावंतांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे नांदेड येथे आयोजन

Chief Editor

Leave a Comment