एम सी आर
Uncategorized

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त सुरुवात

—————————————–
उदगीर :-येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये शै.वर्ष2025-26 च्या वार्षिक स्नेहसंमेलनास उस्फूर्तपणे सुरुवात झाली आहे. सदरील स्नेहसंमेलन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ.शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता तथा विद्यार्थी कल्याण मंडळ विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, क्रिडा विभाग प्रमुख प्रा.राशेद दायमी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सदरील वार्षिक स्नेहसंमेलन हे 02 ते 06 फेब्रुवारी या दरम्यान चालणार आहे. या स्नेहसंमेलनात पारंपरिक वेशभूषा, पाश्चात्य वेशभूषा, अंताक्षरी, संगीत खुर्ची, गीत गायन, प्रश्न मंजुषा, वाद – विवाद स्पर्धा, मुक अभिनय,आनंद नगरी,समूह गायन, मिमिक्री स्पर्धा, शेला पागोटे सादे आणि संगीत तर सांस्कृतिक महोत्सवात वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, नाटक, आदी स्पर्धेसह अनेक भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. असिफ दायमी,प्रा.वैष्णवी गुंडरे, प्रा.नावेद मणियार,प्रा.नम्रता कुलकर्णी, प्रा.रोहिणी वाघमारे, प्रा.अभिमन्यू भोसले, प्रा.अंजली रविकुमार, प्रा.पूजा माने, प्रा.सायमा पटेल, काजल सांगवे,अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, बायडी वाघमारे यांच्यासह सर्व वर्ग प्रतिनिधी परिश्रम घेत आहेत.

Share

Related posts

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण

Chief Editor

आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा (डी-झोन) २०२६–२७ वार्षिक नियोजन बैठक संपन्न

Chief Editor

श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांना ‘यशवंत ‘ मध्ये विनम्र अभिवादन

Chief Editor

१२ दिवसांची रेल्वे सफर ! पार्सल विभागाच्या गलथान कारभाराने दुचाकीचे हेलपाटे

Chief Editor

जिजाऊंच्या संस्काराचा वसा आणि वारसा आजच्या मुलींनी घ्यावा: सुभाष ढगे

Chief Editor

यशवंत ‘ मधील डॉ.मदन अंभोरे यांना ६० लक्ष रुपये बृहद संशोधन प्रकल्प प्राप्त

Chief Editor

Leave a Comment