एम सी आर
Uncategorized

विद्यार्थ्यांनी, अभ्यास चौकस बुद्धीने करावा’* ‘स्वारातीम’ विद्यापीठातील एकदिवसीय कार्यशाळेत डॉ. दायमा यांचे प्रतिपादन

नांदेड: दिनांक १० सप्टेंबर 2026 (डॉ.प्रवीणकुमार सेलुकर)
विद्यार्थ्यांनी प्रत्येक परीक्षेचा अभ्यास हा वरवर न करता तो अत्यंत चौकस बुद्धीने करावा, म्हणजेच प्रत्येक संकल्पना, प्रत्येक घटना ही थ्री सिक्सटी डिग्रीमधून अभ्यासावी, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साधन व्यक्ती डॉ. ब्रिजमोहन दायमा यांनी केले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलाच्या वतीने ९ सप्टेंबर, २०२६ रोजी यूजीसी-नेट आणि सेट पेपर-१ संदर्भात एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उपस्थित विद्यार्थी व संशोधकांना मार्गदर्शन करताना डॉ. ब्रिजमोहन दायमा बोलत होते. याप्रसंगी मंचावर साधन व्यक्ती डॉ. सारीका दायमा, व्यवस्थापन परिषद सदस्य इंजिनिअर नारायण चौधरी, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. प्रमोद लोणारकर, अधिसभा सदस्या डॉ. शालीनी कदम, डॉ. नंदकुमार बोधगिरे व डॉ. बाबूराव जाधव आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी, प्र-कुलगुरू डॉ अशोक महाजन यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद लोणारकर यांनी, तर डॉ. झिनत शेख यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. स्मिता नायर यांनी, तर डॉ. शिवाजी गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यशाळेला विद्यार्थी व संशोधकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. प्रमोद लोणारकर यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. गौतम गायकवाड, सहसमन्वयक डॉ. संदीप जाधव, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. तातेराव पवळे, डॉ. रवी मोरताट, डॉ. वसंत सोळंके, प्रा. अतुल समिंद्रे, प्रा. ओमकार मठपती व त्यांच्या सर्व सहकारी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

——————————-

Share

Related posts

उद्योजक व ध्यानसाधनेचे मिश्रण: सुरेश धूत (लेखक:डॉ. अजय गव्हाणे)

Chief Editor

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरूपरीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक कार्यर

Chief Editor

ज्योतिरादित्या मुठ्ठे ची राज्यस्तरीय किंकबॉक्सिंग स्पर्धेत दोन रौप्य पदकांना गवसंनी

Chief Editor

श्रद्धेय कै. डॉ. शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त ‘यशवंत ‘ मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

Chief Editor

स्त्रीचे आरोग्य हाच तिच्या आत्मविश्वासाचा पाया : डॉ. उज्वला सदावर्ते

Chief Editor

भक्ती आणि शक्ती हे आयुष्य जिंकण्याचे सूत्र – संजय भोसले

Chief Editor

Leave a Comment