एम सी आर

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालया मध्ये शिवणकाम व ब्यूटीपार्लर कार्यशाळे चा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला

Uncategorized

नांदेड: दि. 17 ऑगस्ट 2026
दि. 17 सोमवार रोजी कै. सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालया च्या राजमाता जिजाऊ स्त्री अभ्यास केंद्र व बी. व्होक फॅशन टेकनॉलोजी यांच्या सयुंक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांच्या संकल्पनेतून दिनांक 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान शिवणकाम व ब्यूटी पार्लर महाविद्यालयातील विद्यार्थीनी साठी या मोफत कार्यशाळे चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळे चे उद्घाटन प्राचार्य डॉ.भिसे सरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ.भिसे सरांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केेले. स्वतःचा पायावर उभे राहण्यासाठी ही कार्यशाळा महत्वाची आहे.”राजमाता जिजाऊ” स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. संगीता लोमटे यांनी या कार्यक्रमा ची भूमिका मांडली बी. व्होक च्या प्रा. मुमताज़ खान मॅडम व ब्यूटी पार्लर च्या प्रा. राजश्री राउत मॅडम उपस्थित होत्या त्यांनी या प्रसंगी दोन्ही कार्यशाळे मध्ये शिकविल्या जाणाऱ्या कौशल्या ची माहिती दिली.या कार्यशाळेला विद्यार्थीनीचा भरगोस प्रतिसाद लाभत आहे.या कार्यक्रमा चे सूत्र संचलन व आभर डॉ. नसिम बेगम मॅडम यांनी केले.

Share

Related posts

डिजिटल युगात हिंदीतून रोजगाराच्या अमर्याद संधी -डॉ. कोमलकुमार परदेशी

Chief Editor

यशवंत ‘ मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राज्यस्तरीय सुयश

Chief Editor

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज२५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजनकार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chief Editor

विकास, गुंतवणूक व रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्प: आरिफ खान

Chief Editor

हनुमान पेठ, नांदेड-भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक सुमित मुथा यांची निवड.

Chief Editor

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून धनगर समाजात शैक्षणिक चळवळीला बळ

Chief Editor

Leave a Comment