*चार जिल्ह्यांसाठी District Coordination Units व Cluster Coordination Unitsच्या माध्यमातून OJT–Internshipचे व्यापक नेटवर्क विकसित करण्याचा निर्णय*
नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्न महाविद्यालयांमध्ये तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी On-the-Job Training (OJT) आणि Internship प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या Task Forceची बैठक 16 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या पुढाकाराने विद्यापीठाच्या चारही जिल्ह्यांमध्ये OJT व Internshipची सक्षम आणि शाश्वत Ecosystem विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण घेत असतानाच उद्योग, स्वयंसेवी संस्था, शासकीय व निमशासकीय संस्था, बँका, व्यावसायिक आस्थापना, सेवा क्षेत्र तसेच इतर व्यावसायिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानासोबतच Experiential Learning, Professional Skills, Employability Skills आणि कार्यक्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
या उपक्रमासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र District Coordination Units (DCUs) स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे नेतृत्व संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठातांकडे सोपविण्यात आले असून, त्याअंतर्गत विविध Cluster Coordination Units (CCUs) आणि Lead Colleges निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत OJT व Internshipच्या संधी पोहोचविण्यासाठी विकेंद्रित आणि प्रभावी समन्वय यंत्रणा निर्माण होणार आहे.
नांदेड जिल्हा :
नांदेड जिल्हा समन्वय युनिटचे नेतृत्व प्रा. डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रभारी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, यांच्याकडे असून यशवंत महाविद्यालय, नांदेड हे District Coordination Unit म्हणून कार्य करणार आहे. जिल्ह्यातील Lead Colleges म्हणून Science College Nanded, Yashwant College Nanded, Shivaji College Kandhar, Sant Gadge Maharaj College Loha, LBS College Dharmabad, Sharadchandra ACS Naigaon, Degloor College Degloor, D.B. College Bhokar, Datta ACS Hadgaon, Renukadevi College Mahur, B.P. College Kinwat आणि Shair Annabhau Sathe College Mukhed यांचा समावेश आहे.
परभणी जिल्हा :
परभणी जिल्ह्याचे नेतृत्व डॉ. चंद्रकांत बाविस्कर, अधिष्ठाता, यांच्याकडे असून शिवाजी महाविद्यालय, परभणी हे District Coordination Unit आहे. DSM ACS Parbhani, Shivaji Mahavidyalaya Parbhani, Smt. Sankuntala Bordikar College Jintur, Shri Sant Janabai Education ACS College Gangakhed, Swatantrya Sainik Suryabhanji Pawar College Purna, KKM College Manwat आणि Warpurkar College Sonpeth ही Lead Colleges निश्चित करण्यात आली आहेत.
लातूर जिल्हा :
लातूर जिल्ह्याचे नेतृत्व डॉ. एम. के. पाटील, अधिष्ठाता, यांच्याकडे असून Dayanand Science College, Latur हे District Coordination Unit म्हणून कार्य करणार आहे. Mahatma Basaveshwar College Latur, Kumar Swami College Ausa, Maharashtra College Nilanga, Kai Rasika Mahavidyalaya Deoni, Maharashtra Mahavidyalaya Udgir, Sambhaji Kendre College Jalkot, Mahatma Gandhi Adhyapak College, Bhai Kisan College Chakur, Shivaji Mahavidyalaya Rainapur आणि Dayanand College Group या Lead Collegesचा समावेश आहे.
हिंगोली जिल्हा :
हिंगोली जिल्ह्याचे नेतृत्व डॉ. पराग खडके, अधिष्ठाता, यांच्याकडे असून आदर्श महाविद्यालय, हिंगोली हे District Coordination Unit आहे. Model Degree College Hingoli, Toshniwal College Sengaon, Satav College Kalamnuri, Nagnath College Aundha Nagnath आणि Baherji Smarak College Basmat ही Lead Colleges निश्चित करण्यात आली आहेत.
या Task Forceच्या माध्यमातून विद्यापीठातील विविध घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे. जिल्हानिहाय व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून नांदेडसाठी डॉ. नरेंद्र चव्हाण, परभणीसाठी इंजि. नारायण चौधरी, लातूरसाठी डॉ. महादेव गव्हाणे आणि हिंगोलीसाठी डॉ. डी. एन. मोरे यांचा समावेश आहे.
तसेच व्यवस्थापन परिषद सदस्यांमध्ये नांदेडसाठी डॉ. प्रशांत पेशकर, परभणीसाठी डॉ. सुरेखा भोसले, लातूरसाठी डॉ. संताराम मुंडे आणि हिंगोलीसाठी डॉ. सूर्यकांत जोगदंड यांचा समावेश करण्यात आला आहे.
Academic Councilच्या प्रतिनिधींमध्ये नांदेड जिल्ह्यासाठी डॉ. डी. आर. मुंडे (Science College), डॉ. लक्षट्टे आर. बी. (Degloor) आणि डॉ. सुरेखा एम. (KRM Mahavidyalaya); परभणीसाठी डॉ. अंबादास कदम (DSM Parbhani), डॉ. रोहिदास नितोंडे (Shivaji College) आणि डॉ. सी. के. हरणावडे (People’s College, Nanded Commerce); लातूरसाठी डॉ. एन. टी. कांबळे (Swami Vivekanand College), डॉ. दुर्गा सत्यनारायण शर्मा (Animation, Dayanand College) आणि डॉ. पी. टी. पवार (Commerce, Renapur College); तर हिंगोलीसाठी डॉ. मोहन रोडे (Commerce, People’s College), डॉ. नागनाथ गजभिये (Sports, B.S. College, Basmat) आणि डॉ. डी. के. स्वामी (P.N. College, Nanded Chemistry) यांचा समावेश आहे.
चारही जिल्ह्यांमध्ये OJT–Internship Ecosystemच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन
*बैठकीदरम्यान प्र-कुलगुरू मा. डॉ. अशोक महाजन यांनी चारही जिल्ह्यांमध्ये OJT व Internship Ecosystemची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धती आपल्या सादरीकरणाद्वारे (Presentation) स्पष्ट केली. जिल्हा समन्वय युनिट, Cluster Coordination Units आणि Lead Colleges यांनी कोणत्या पद्धतीने समन्वय साधावा, विद्यार्थ्यांसाठी OJT व Internshipच्या संधी कशा निर्माण कराव्यात, विविध उद्योग व संस्थांशी संपर्क कसा प्रस्थापित करावा आणि या उपक्रमातून अपेक्षित परिणाम कशा पद्धतीने प्राप्त करावेत, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.*
सविस्तर मांडणी करताना प्र कुलगुरू डॉ महाजन यांनी 1 sept ते 15 November या 10 आठवड्यांच्या विद्यार्थ्यांच्या OJT साठी च्या पूर्वतयारीसाठी चे सविस्तर नियोजन मांडले…
*त्या नुसार पहिल्या 3 आठवड्यात चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुढील टप्प्याचे काम 4-5 आठवड्यांचे OJT Partner organizations चि उपलब्धतेवर cluster system मधून कामकाज केले जाणार आहे*
चार जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष उपक्रम राबवून परिणाम साधण्याचे कुलगुरूंचे निर्देश
बैठकीच्या अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी Task Forceच्या पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. चारही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष OJT व Internshipच्या उपक्रमांना गती देऊन, नियोजित पद्धतीने विविध जिल्ह्यांतील व क्लस्टरमधील गतिविधी राबविणे आणि Task Forceच्या माध्यमातून ठोस व मोजता येण्याजोगे परिणाम (Outputs) प्राप्त करणे, ही पुढील टप्प्यातील प्रमुख दिशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव मिळण्याबरोबरच या संपूर्ण प्रक्रियेचे प्रभावी नियोजन, समन्वय आणि परिणामांचे मूल्यमापन करण्यावर त्यांनी भर दिला.
या बैठकीत जिल्हानिहाय तसेच क्लस्टरनिहाय OJT व Internshipच्या संधी निर्माण करणे, उद्योग व विविध संस्थांशी संपर्क प्रस्थापित करणे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत प्रशिक्षणस्थळे निश्चित करणे, Lead Collegesमार्फत समन्वय साधणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कार्यानुभव उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती विकसित करणे यावर चर्चा करण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना “Learn while Working” आणि “Learning through Experience” या संकल्पनेनुसार प्रत्यक्ष कार्यक्षेत्राशी जोडण्यास मदत होणार आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, उद्योग, शासकीय संस्था, NGOs आणि विविध सेवा क्षेत्र यांच्यामध्ये मजबूत समन्वय निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण OJT/Internshipची संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बैठकीचे आयोजन व संचालन डॉ. शैलेश वाढेर, संचालक, Innovation, Incubation and Linkages (IIL), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी केले. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही व्यवस्था विद्यार्थ्यांना शिक्षण आणि प्रत्यक्ष कार्यक्षेत्र यांच्यातील दरी कमी करून त्यांच्या कौशल्यविकास, रोजगारक्षमता आणि व्यावसायिक तयारीला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
——-+++++——-
