एम सी आर

स्वारातीम’ विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धा २ ते ६ एप्रिल दरम्यान

Uncategorized

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे दिनांक २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो (मुले) स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा बाद व साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री मा. श्री. इंद्रनील नाईक यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. मनोहर चासकर राहणार आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू व भारतीय खो-खो संघाचे कर्णधार प्रतीक वाईकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य, सिनेट सदस्य, अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थान या पाच राज्यांतील एकूण ७४ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी विद्यापीठ परिसरात चार क्रीडांगणांची निर्मिती करण्यात आली असून, सामने दिवस व प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ही स्पर्धा खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
————————-

Share

Related posts

उर्दूमधून भगवद्गीतेचे लेखन; फातिमा ताईंनी लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना दिली आवृत्ती

Chief Editor

मांडवीयाञेत शंकर पटामुळे शेतकऱ्यांच्या. चेहऱ्यावर आनंद उत्साह.

Chief Editor

सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ मनोहर चासकर

Chief Editor

कॅल्शियम हे एक आवश्यक मिनरल आहे जे आपल्या शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक आहे. मीरा धुळगुंडे

Chief Editor

नांदेड पोलीसांची धडक कारवाई : ८४ ‘फटाका सायलेंसर’ जप्त, रोड रोलरने नष्ट

Chief Editor

हायड्रेट हर्बलाइफ: उन्हाळ्यातील ताजगीसाठी

Chief Editor

Leave a Comment