एम सी आर

नांदेड महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्र. 10 (अ) मधून ॲड. ज्ञानेश्वर धडके यांचा सर्वांगीण विकासाचा निर्धार

Uncategorized

नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलुकर)
नांदेड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक–2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 (अ) अनुसूचित जाती प्रवर्गातून अपक्ष उमेदवार म्हणून अॅड. ज्ञानेश्वर रामलिंग धडके यांनी निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला आहे. प्रभागाच्या सर्वांगीण, गतिमान आणि समतोल विकासासाठी त्यांनी सविस्तर विकास वचननामा जाहीर करत नागरिकांकडून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

अॅड. धडके यांच्या वचननाम्यात महिला, युवक, विद्यार्थी, कामगार, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच तळागाळातील गरजू घटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. प्रभागातील महिला व युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कुटीर व लघुउद्योग उघडण्यास प्रोत्साहन देण्यात येणार असून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी MPSC, UPSC तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास केंद्र व सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच महिला सशक्तीकरण, युवा रोजगार, आरोग्य आणि सुदृढ नागरिक अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
प्रभागात स्वच्छ व सुंदर आदर्श वॉर्ड अभियान राबवून 24 तास स्वच्छ पाणीपुरवठा, चकचकीत रस्ते, अंडरग्राऊंड पाणी निचरा व्यवस्था, तसेच अखंड 24 तास वीजपुरवठा व अद्यावत डीपी उपलब्ध करून देण्याचा निर्धार ॲड. धडके यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांच्या तक्रारी व अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी 24/7 नगरसेवक हेल्पलाईन मदत कक्ष सुरू करण्यात येणार असून महिलांसाठी स्वतंत्र 24 तास कार्यरत महिला हेल्पलाईन कक्ष उभारण्यात येणार आहे. तसेच वार्डातील रुग्णांसाठी 24 तास अन्नछत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रभागाच्या चारही बाजूंना महापुरुषांच्या भव्य व सुंदर कमानी उभारण्यात येणार असून त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान, अन्नदान, व्यसनमुक्ती शिबिरांसारखे सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविले जाणार आहेत. संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षिततेवर भर देण्यात येणार असून वृक्षलागवड व निसर्गसंवर्धन केंद्र उभारले जाणार आहे.

युवकांसाठी रोजगारपर ऑटो प्रशिक्षण व ऑटो उपलब्ध करून देणे, उद्योगधंद्यांसाठी युवा लोन अभियान, तसेच सरकारी योजनांची माहिती देणारे गरीब व गरजू नागरिकांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. महिला आरोग्य तपासणी अभियान, महिला बचत गट व कर्ज प्रोत्साहन कार्यक्रम, तसेच सामाजिक कार्यक्रमांचे वार्षिक आयोजन करण्याचेही वचन देण्यात आले आहे.

गरिब व गरजू मुला-मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत योजना, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, खेळाचे मैदान, ओपन जिम सुविधा आणि जिल्हास्तरीय उद्योग रोजगार शिबिरांचे आयोजन हे देखील वचननाम्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत.

प्रभाग क्रमांक 10 (अ) च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या अॅड. ज्ञानेश्वर रामलिंग धडके यांना निवडणूक निशाणी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

Share

Related posts

यशवंत ‘ मधील एनसीसी कॅडेट अक्षय बागल यांची सीआयएसएफ मध्ये निवड

Chief Editor

बदलत्या जीवनशैलीत योग्य आहाराचे महत्त्व – मीरा धुळगुंडे”

Chief Editor

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींना वैमानिक होण्यासाठी “गिविंग विंग्स टू फ्लाई “उपक्रम.

Chief Editor

नांदेडमध्ये ‘हरित नांदेड’ अभियानांतर्गत 1000 महावृक्षांची लागवड 600 वृक्षांचे घनवन, तर 400 मोठ्या वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संकल्प

Chief Editor

जलसंधारणाचे अतुलनीय कार्य श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी केले -प्रा.इंद्रजीत भालेराव

Chief Editor

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विजयी*

Chief Editor

Leave a Comment