एम सी आर

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना ‘ग्लोबल ग्रीन लीडरशिप अवॉर्ड’ शाश्वत विकास व पर्यावरण संवर्धनातील नेतृत्वाचा गौरव; विद्यापीठ परिवारात आनंदाचे वातावरण

Uncategorized

नांदेड, दि. २६ सप्टेंबर :
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि हरित उपक्रमांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल ग्रीन लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला आणखी एक मानाचा गौरव प्राप्त झाला आहे.

कुलगुरू डॉ. चासकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या विकास प्रक्रियेत पर्यावरणपूरक दृष्टिकोनाला विशेष महत्त्व देण्यात येत आहे. शाश्वत विकास, हरित परिसर, वृक्षसंवर्धन, पर्यावरण जागृती तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांना चालना देण्यात येत आहे. ‘विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण’ हा दृष्टिकोन विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत अधोरेखित होत आहे.

या कार्याची दखल घेत कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना मिळालेला ‘ग्लोबल ग्रीन लीडरशिप अवॉर्ड’ हा त्यांच्या नेतृत्वाचा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव मानला जात आहे.

या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Share

Related posts

शेतकऱ्याच्या मुलांची गरुड झेप :आर्मी मध्ये लेफ्टनंट हे पद संपादन

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये शोधचक्र प्रणालीवर ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात प्रभारी वित्त व लेखाधिकारीपदी डॉ. राजेश शिंदे यांची नियुक्ती

Chief Editor

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाचे आयोजन

Chief Editor

नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chief Editor

Leave a Comment