लोकप्रशासन नागरिकांचे वर्तन नियंत्रित करते: डॉ. बाजीराव वडवळे

नांदेड:
काळ कोणताही असो शासन पद्धती कोणती असो अगदी अनादी काळापासून लोकप्रशासन अस्तित्वात असलेले दिसून येते आणि याचा सर्वांगीण अभ्यास करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी दररोज नियमितपणे वर्तमानपत्रे वाचणे गरजेचे आहे .कारण जन्माच्या अगोदर पासून ते मृत्यू पश्चात लोकप्रशासनाची कार्य निरंतर पणे जनतेच्या कल्याणासाठी सुरू असतात. लोकप्रशासनामुळेच नागरिकाचे दैनंदिन जीवन नियंत्रित केलं जातं असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयाच्या लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे उद्घाटन करताना डॉक्टर बाजीराव वडवळे यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंत महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर मिरा फड यांनी डॉक्टर बाजीराव वडवळे यांचे पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले त्याचबरोबर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर कविता सोनकांबळे या उपस्थित होत्या
डॉक्टर बाजीराव पडवळ यांनी लोकप्रशासन अभ्यास मंडळाच्या विद्यार्थी सदस्य व अध्यक्षांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
यावेळी लोकप्रशासन विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचेही उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप करताना आपल्या अध्यक्ष भाषणात महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉक्टर कविता सोनकांबळे यांनी लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र हे दोघे जुळे भावासारखे आहेत ह्या दोन्ही शाखा म्हणजे एका वृक्षाच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत त्यामुळे लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र हे एकमेकांच्या हातात हात घालून जनतेच्या अपेक्षा गरजा व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात असे प्रतिपादन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक विभाग प्रमुख डॉक्टर मीरा फड यांनी केले तर आभार प्रदर्शन लेफ्टनंट डॉक्टर आर पी गावंडे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते