एम सी आर
Uncategorized

शेतकऱ्याच्या मुलांची गरुड झेप :आर्मी मध्ये लेफ्टनंट हे पद संपादन

नांदेड:
आज JEE,NEET, व तत्सम परीक्षेच्या माध्यमातून डॉक्टर इंजिनियर होऊन मोठे पॅकेजचे स्वप्न पाहणाऱ्या काळात एक ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा देशसेवेचे स्वप्न पाहतो आणि भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट होऊन ते प्रत्यक्षात उतरवतो. भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे अत्यल्प प्रमाण आहे. अशा या वेगळ्या वाटेचा वाटसरू म्हणजे लेफ्टनंट तुषार.हे उदाहरण आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील बेलखेड या छोट्याशा गावातील कु. तुषार भीमराव फटिंग यांचे.ग्रामीण भागात शालेय शिक्षण पूर्ण करून आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर TCS सारख्या नामांकित कंपनीमध्ये जॉब करत करत(UPSC) यूपीएससी परीक्षा आणि एसएसबी (SSB) च्या मुलाखतीद्वारे इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट हे पद संपादन केले आहे. त्याचे हे यश म्हणजे ग्रामीण भागातील तरुणाची गरुड झेप आहे .ग्रामीण भागातील तरुणांसाठी ‘गरुड’ हे जिद्द, चिकाटी आणि प्रतिकूल परिस्थितीत उंच झेप घेण्याचे प्रतीक आहे. गरुडाप्रमाणे वादळातही न डगमगता संघर्ष करणे, स्वतःचे भक्ष्य स्वतः मिळवणे आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून प्रगती करणे, हे आजच्या तरुणांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Share

Related posts

शब्दांच्या उत्सवात न्हालेला अविस्मरणीय सोहळा “शब्द शब्द तुझाच आहे” कविता संग्रहाचे दिमाखदार प्रकाशन.

Chief Editor

स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी रवाना

Chief Editor

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

Chief Editor

प्रो. राजाराम माने यांच्या संशोधन टीमच्या ‘विषारी वायू शोधक’ उपकरणाला केंद्र सरकारचे पेटंट

Chief Editor

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष.

Chief Editor

यशवंत ‘मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत विशेष व्याख्यान संपन्न

Chief Editor

Leave a Comment