एम सी आर

फार्मा शिक्षक क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद फार्मसीचा संघ विजेता

Uncategorized

—————————————
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद फार्मसी महाविद्यालयाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने आयोजित द्वितीय फार्मा शिक्षक क्रिकेट 2026 स्पर्धेत अंतिम सामना जिंकत विजेते पद पटकावले आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी संघातील सर्व खेळाडूचे अभिनंदन केले.
या स्पर्धेत अंतिम सामना हा स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी,उदगीर व शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी,आलमला यांच्यात खेळण्यात आला. अत्यंत चुरसीच्या व अटीतटीच्या सामन्यात स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी, उदगीरच्या संघातील डॉ. गणेश तोलसरवाड यांच्या नेतृत्वात दिग्विजय केंद्रे
महेश मुक्ता,विश्वनाथ मोरखंडे,नवनाथ बेंडके,शिवराज सुर्यवंशी, श्रीपाद अहंकारी,सिद्धेश्वर शिकरे,आनंद मठपती,सुमित पाटील, समीर शेख,विजयकुमार झंवर,अनिल चोपडे,नितीन इंगळे, लंजिले प्रवीण यांनी चमकदार कामगिरी करीत निर्णायक सामना आपल्याकडे खेचत विजेते पद पटकावले.
सदरील संघाने मिळवलेल्या त्याबद्दल संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, संस्थेच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुख स्नेहा लांडगे, पत्रकारिता व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, वैभव बिडवे, संदेश गवळे यांनी अभिंनंदन केले.

Share

Related posts

मंत्रालयातील कथित कर्मचाऱ्यांचा आगळा-वेगळा प्रताप..! शासकीय नोकरीत असूनही पदाचा गैरवापर करून मानसिक त्रास; डॉ. निलेश बास्टेवाड यांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

Chief Editor

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींना वैमानिक होण्यासाठी “गिविंग विंग्स टू फ्लाई “उपक्रम.

Chief Editor

यशवंत ‘ भारत एन्व्हॉर्मेंट प्रोग्रामद्वारे राष्ट्रस्तरीय प्लॅटिनम गोल्ड पारितोषिकाने सन्मानित

Chief Editor

नांदेड महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्र. 10 (अ) मधून ॲड. ज्ञानेश्वर धडके यांचा सर्वांगीण विकासाचा निर्धार

Chief Editor

फुले-शाहू-आंबेडकर विचारांवर ‘शताब्दी २०२६’ अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

कै.सौ. कमलताई जामकर यांच्या जयंती निमित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

Chief Editor

Leave a Comment