एम सी आर
Uncategorized

फुले-शाहू-आंबेडकर विचारांवर ‘शताब्दी २०२६’ अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन

ज्येष्ठ पत्रकार मा. पाशम यादगिरी यांचे मुख्य व्याख्यान; कुलगुरू डॉ. मनोहर चासकर अध्यक्षस्थानी”

नांदेड, दि. ९ (ग्रामीण प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त तसेच ‘फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव – शताब्दी २०२६’ अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर राहणार असून, प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा ‘सा.का.’ आणि ‘तेलंगणा न्यूज टीव्ही’चे संपादक मा. पाशम यादगिरी उपस्थित राहणार आहेत. ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा व परिवर्तनवादी विचारांचा सखोल उहापोह करणार आहेत. विशेष उपस्थितीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, हैदराबाद येथील कस्टम व जीएसटी विभागाचे माजी अधीक्षक महेश्वर राज, प्र-कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत वाविस्कर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनीता वाय. पाटील यांचा समावेश आहे. समतावादी व मानवतावादी विचारांचे समाजातील महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र तसेच प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. आयोजकांनी विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारप्रबोधनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Share

Related posts

नीट पेपरफुटी प्रकरणाचा परिणाम; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

Chief Editor

नांदेड महापौर चषक स्पर्धांचे आयोजन व क्रीडा शिष्यवृत्ती योजनेसाठी महापौरांना निवेदन

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्वक संपन्न*

Chief Editor

*शाश्वत विकासासाठी युवक – जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास शिबीराचे जग्गुनाईक तांडा येथे उद्घाटन संपन्न* ()

Chief Editor

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष.

Chief Editor

Leave a Comment