एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठात आशाताई जाधव (शिंदे) यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वरिष्ठ लिपीक स्व. श्रीमती आशाताई विजय जाधव (शिंदे) यांच्या दुःखद निधनाबद्दल विद्यापीठाच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभा मंगळवार, दि. २६ मे २०२६ रोजी मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
स्व. आशाताई जाधव (शिंदे) यांनी आपल्या सेवाकाळात कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व समर्पित भावनेने कार्य करत विद्यापीठ प्रशासनात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अकाली निधनामुळे विद्यापीठ परिवाराने एक मनमिळावू, कर्तव्यदक्ष व सहृदय सहकारी गमावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, जैवतंत्रशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. बी.एस. सुरवसे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
स्व. आशाताई जाधव (शिंदे) यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व शोकाकुल परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशी प्रार्थना करण्यात आली. श्रद्धांजली सभेचा समारोप दोन मिनिटे मौन पाळून करण्यात आला.
————————-

Share

Related posts

बुद्धिबळ हा खेळ भारतीय बौद्धिक परंपरेचे प्रतीक आहे -डॉ. सी. आर. बाविस्कर

Chief Editor

थायरॉइड नियंत्रणासाठी नैसर्गिक उपाय | फिटनेस स्टुडिओकडून हमखास मार्गदर्शन: मीरा धुळगुंडे आरोग्य सल्लागार

Chief Editor

संत गाडगेबाबा यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्नशील – महापौर कविता मुळे

Chief Editor

१२ दिवसांची रेल्वे सफर ! पार्सल विभागाच्या गलथान कारभाराने दुचाकीचे हेलपाटे

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय खगोलभौतिकी परिषद

Chief Editor

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज२५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजनकार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chief Editor

Leave a Comment