एम सी आर
Uncategorized

नांदेडमध्ये घरफोडी प्रकरणाचा छडा तीन आरोपी अटकेत • रोख रक्कम जप्त

नांदेड, दि. 14 फेब्रुवारी – शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यनगर परिसरात घरफोडी करून रोख रक्कम चोरी करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली होती. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तपास सुरू करून गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपास पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ₹2,000 रोख रक्कम जप्त केली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे :
▪ बुद्धिभूषण मधुकर गोविंद (वय 19), रा. भाग्यनगर, नांदेड
▪ युवराज राजू राठोड (वय 19), रा. देगलूर नाका, नांदेड
▪ विशाल मिठेखान गायकवाड (वय 22), रा. शंकरनगर, नांदेड

ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या सहकार्याने करण्यात आली. पुढील तपास भाग्यनगर पोलीस ठाणे करीत आहे.

दरम्यान, नागरिकांनी घर सुरक्षित ठेवण्याबाबत खबरदारी घ्यावी तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Share

Related posts

यशवंत ‘ मधील कॅडेट्सची दार्जिलिंग राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

Chief Editor

विज्ञान आणि आरोग्य यांच्या समन्वयामुळे समाज सुदृढ बनू शकतो – डॉ. नितीन जोशी यांचे प्रतिपादन

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Chief Editor

हिंदी विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. अनीता दिगंबर सिंह रावत यांचे निधन

Chief Editor

अर्थशास्त्रातील करिअर संधीवर प्राध्यापक सागर कोंडेकर यांचे मार्गदर्शन कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन

Chief Editor

२२ जानेवारी रोजी कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात बोलींचा जागर कार्यक्रमाचे आयोजन.

Chief Editor

Leave a Comment