नांदेड :(दि. ७ ऑगस्ट २०२६)
यशवंत महाविद्यालयात इंग्लिश लिटररी असोसिएशनमार्फत माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ. माधव दुधाटे, डॉ. कैलास इंगोले, आणि विभागप्रमुख प्रो.डॉ. एल. व्ही. पद्माराणी राव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, डॉ. एस. राधाकृष्णन हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. भारताच्या सर्वोच्चपदी राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याचा बहुमान शिक्षकाला प्राप्त झाल्यामुळे शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
याप्रसंगी कु. मसिरा अंफाल बी.ए. तृतीय वर्ष, कु. पुनम भोसले, बी.ए. द्वितीय वर्ष, आणि कु. स्नेहा जाधव , बी.ए. द्वितीय वर्ष, चि. ज्ञानेश्वर डाके, बी.ए. द्वितीय वर्ष यांनी प्रति-शिक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वसुंधरा रूईकर, बी.ए. द्वितीय वर्ष आणि कु. सांची नवसागरे, बी. ए. प्रथम वर्ष यांनी केले. आभारप्रदर्शन कु. जाहिरीन, बी. ए. प्रथम वर्ष हीने केले.
याप्रसंगी इंग्रजी विभागातील डॉ.रत्नमाला म्हस्के डॉ. स्वाती मदनवाड, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रशांत मुंगल यांनी सहकार्य केले.
