‘
मुंबई : बहुचर्चित ‘दृश्यम’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘दृश्यम : द कन्क्लुजन’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला असून, अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे.
ट्रेलरमध्ये जुन्या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळते. पोलिसांच्या हाती काही नवे पुरावे लागल्याने विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबासमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे राहिले आहे.
या चित्रपटात तब्बूसोबत जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे चित्रपटातील संघर्ष आणि रहस्य आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.
‘दृश्यम : द कन्क्लुजन’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे विजय साळगावकर यावेळी आपल्या कुटुंबाला वाचवणार की जुन्या रहस्याचा पर्दाफाश होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
MCR NEWS — जिथे नाही कुणी, तिथे फक्त आम्ही.
