एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठातील चंपत हंबर्डे यांचे निधन; विद्यापीठात श्रद्धांजली सभा

नांदेड:
‌स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील बांधकाम पर्यवेक्षक चंपत घनश्याम हंबर्डे यांचे रविवारी (दि. ७ जून) दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने विद्यापीठ परिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत असून एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि मनमिळावू सहकारी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

दिवंगत चंपत हंबर्डे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सोमवारी (दि. ८ जून) सायंकाळी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शोकसभेस कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोकसभेच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभावी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना केली.

————————–

Share

Related posts

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया* – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

Chief Editor

BH सिरीज वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा; अन्यथा विशेष तपासणी मोहिमेत कारवाई. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये राज्यशास्त्रातील करिअर संधीवर व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

बदलत्या जीवनशैलीत योग्य आहाराचे महत्त्व – मीरा धुळगुंडे”

Chief Editor

नांदेडमध्ये ‘असूड मोर्चा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; वाजिद अन्सारी यांच्याकडून शेतकऱ्यांचे आभार

Chief Editor

*ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला ) वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी

Chief Editor

Leave a Comment