एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मधील प्रा.माधव दुधाटे यांना पीएच.डी. प्राप्त

नांदेड:(दि. ३० जुलै २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय इंग्रजी विभागातील प्रा.माधव शामराव दुधाटे यांना ‘स्ट्रगल फॉर आयडेंटिटी अँड सेल्फ एक्झिस्टन्स ऑफ आफ्रिकन अमेरिकन वुमेन इन द सिलेक्ट प्लेज ऑफ ल्यान नोटेज’ या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. डॉ.शंकररावजी चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथील प्रभारी प्राचार्य डॉ. अजय आर. टेंगसे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विद्यावाचस्पती पदवी प्राप्त झाल्याबद्दल माजी प्र-कुलगुरु तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी यथोचित सत्कार केला आणि भविष्यातील संशोधकीय कार्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ. कैलास इंगोले, डॉ. सचिन वडजे, प्रा.चैतन्य देशमुख, यांची उपस्थिती होती. तसेच इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एल. व्ही. पद्माराणी राव, डॉ.रत्नमाला म्हस्के, डॉ.स्वाती मदनवाड यांनीही डॉ. माधव दुधाटे यांचे अभिनंदन केले.
भाषा विषय विभागप्रमुख डॉ.संजय जगताप, डॉ. संदीप पाईकराव, डॉ.एस. एम. दुर्राणी आणि डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. साईनाथ शाहू, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे,प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रशांत मुंगल, नाना शिंदे यांनीही अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण विभागाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

यशवंत ‘मध्ये टीबी मुक्त भारत अभियान जनजागृती संपन्न

Chief Editor

दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत

Chief Editor

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरूपरीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक कार्यर

Chief Editor

महिलांचे राजकारणातील कर्तृत्व वाखाणण्यासारखे -डॉ.लक्ष्मी पूरणशेट्टीवार

Chief Editor

Leave a Comment