एम सी आर

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरूपरीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक कार्यर

Uncategorized

नांदेड :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या हिवाळी २०२६ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेला दि. ७ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून या परीक्षा नांदेड विभागीय केंद्राअंतर्गत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडत असल्याची माहिती नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार यांनी दिली.
मुक्त विद्यापीठाच्या या परीक्षा दि. ७ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नांदेड विभागात एकूण २३,२३४ परीक्षार्थी परीक्षा देत असून चारही जिल्ह्यांतील ३५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे.
परीक्षा कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी नांदेड विभागीय केंद्राच्या वतीने परीक्षा केंद्रावर एकूण ३५ बहिस्थ पर्यवेक्षक( बैठे पथक) तसेच ७ दक्षता पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दक्षता पथकांमध्ये अनुभवी प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना विद्यापीठाच्या वतीने विनंती पत्र देण्यात आले आहे.सर्व ३५ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत परीक्षा पार पडत असून आतापर्यंत दक्षता पथकाच्या तपासणीत गैरप्रकार करणाऱ्या ८३ विद्यार्थ्यांवर कार्यवाही करण्यात आल्याचेही डॉ. कलेपवार यांनी सांगितलले

दिनांक ११,१४,१५,१६ रोजीच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल
दि. ११ जानेवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तसेच दि. १४, १५ व १६ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा सार्वत्रिक
महानगरपालिका निवडणूक आणि मतमोजणी असल्याने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदरील पेपर विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार दि. २२, २३, २४ व २५ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कल्लेपवार यांनी दिली.

Share

Related posts

नांदेड जिल्ह्याचा किकबॉक्सिंगमध्ये दबदबा; २३ खेळाडू राज्यस्तरासाठी पात्र

Chief Editor

हिंगोलीत भूकंपाचा जोरदार धक्का; नांदेडसह मराठवाड्यात जाणवले हादरे

Chief Editor

मांडवीयाञेत शंकर पटामुळे शेतकऱ्यांच्या. चेहऱ्यावर आनंद उत्साह.

Chief Editor

गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समारंभानिमित्त आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Chief Editor

नितीन गायकवाड यांची अमरावती विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ: भूशास्त्र संकुलाच्या विद्यार्थ्यांची भरारी;स्पर्धा परीक्षा व संशोधन क्षेत्रात यशाचा डंका

Chief Editor

Leave a Comment