https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

संसार हा अनित्य आहे नश्वर आहे _ प्रा. अशोक गेडाम

दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड येथे “प्रतिभा” व्याख्यानमालाचे बारावे पुष्प महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातील प्रा. अशोक गेडाम यांनी “आनंदी जीवनाचा मार्ग ” या विषयावरील व्याख्यानाने गुंफले.प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांच्या मार्गदर्शनाने आयोजित प्रतिभा व्याख्यानमालेचे प्रास्ताविक प्रा. डॉ.स्वाती तांडे यांनी केले. मूल्य शिक्षणाच्या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

आनंदी जीवनाचा मार्ग या विषयावर बोलत असताना भगवान गौतम बुद्धांनी संशोधित केलेली चार आर्य सत्य व्याख्यात्यांनी सांगितली. दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग सांगत असताना संसार हा अनित्य आणि नश्वर आहे असे विधान प्रा. अशोक गेडाम यांनी केले. आयुष्यातील आपली रोजची धावपळ, चढाओढ हि आनंदासाठी आपण करत असतो. पण या दिशेने आपण जितके प्रयत्न करतो त्याअनुरूप आनंदाची प्राप्ती क्वचितच होते.  आनंदी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या दहा चांगल्या सवयींचे विश्लेषण व्याख्यात्यांनी केले. यासाठी लवकर झोपणे व उठणे, व्यायाम, संतुलित भोजन वेळेचा सदुपयोग, व्यसनाधीनतेपासून अलिप्त रहावे, जिज्ञासा नवीन शिकण्याचा भाव, मैत्री भाव आणि कृतज्ञता भाव जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कु. सपना कोकरे हिने केले. व्याख्यानमाले करिता प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर, उपप्राचार्य डॉ. दिलीप स्वामी तसेच सर्व प्राध्यापक वृंद आणि विदयार्थी उपास्थित होते. व्याख्यानमाला यशस्वी करण्याकरिता श्री. राजेश अय्यंगार, श्री. संजय हजारी, श्री. अशोक काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704