https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय येथिल प्रा. बी. बी. ब्रदवाल सेवानिवृत्त .

नांदेड. दि.३०.(प्रतिनीधी)श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय वसरणी नांदेड येथील हिंदी विषयाचे प्रा. बी. बी. ब्रदवाल हे नियत वयोमानानुसार आज दि. ३० सप्टेंबर २३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्या निमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या शुभहस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्राध्यापक हा केवळ त्याच्या सेवा कार्यत्मतेतून मुक्त होतो. परंतु वास्तविक पुढील जीवनात वाटचाल करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजाप्रती निष्ठा बाळगून तो सतत कार्य करतो.
म्हणून प्रा. बी. बी. ब्रदवाल यांनी पुढील जीवन आपल्या कुटुंबासह समाजासाठी द्यावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी शुभकामना यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर संदेशात दिली.
यावेळी प्रा. बी. बी. ब्रदवाल यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ प्रा. डॉ. जगदीश देशमुख, डॉ. राजेंद्र कांगणे, प्रा. पी.बी. चव्हाण, यांच्यासह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. बी. बी. ब्रदवाल म्हणाले की कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांनी माझ्या सारख्या असंख्य सर्वसामान्य कुटुंबातील माणसांना महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार व कृतज्ञता व्यक्त करून. मी या महाविद्यालयात मागील तीस वर्षापासून
माझ्या परीने सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम मी इमाने इतबारे केले आहे. व माझ्या आयुष्यात या महाविद्यालयातील प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, व असंख्य विद्यार्थी कायम माझ्या स्मरणात राहतील. व या पुढील जीवन नक्कीच समाजासाठी खर्च करेल असे भावनिक आव्हान त्यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड, डॉ.जगदीश देशमुख डॉ. राजेंद्र कांगणे डॉ. नागेश कांबळे डॉ. अनिल गच्चे डॉ. विजय मोरे, प्रा. संतोष शिंदे डॉ. सुनिता गरुड मॅडम,कार्यालयीन अधीक्षक आर.डी. राठोड, प्रा. पी.बी. चव्हाण प्रा. एस. डब्ल्यू. कोतवाल, प्रा. एम. एन. मुस्तापुरे,
प्रा. एस . एम.देवकते प्रा. शेख प्रा. आर.जे.झांबरे प्रा.एस.एस.जायदे मॅडम,
डॉ .एल.व्ही. खरात, प्रा. शशिकांत हटकर, बालाजी कोडतिकवार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. टी. सुधळकर मॅडम यांनी केले तर आभार
प्रदर्शन प्रा. आर.जे.झांबरे यांनी मानले.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704