https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

इंदिरा गांधी महाविद्यालयात ‘स्वच्छताही सेवा’ अंतर्गत ‘श्रमदान’ कार्यक्रम यशस्वी.

नांदेड.दि: (संपादक राज गायकवाड) मा. पंतप्रधान यांच्या आवाहनानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथे प्राचार्य. डॉ. राजेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने ‘स्वच्छताही सेवा’ या उपक्रमांतर्गत श्रमदान कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व स्वच्छतेच्या संदर्भात घेतलेल्या शपथ विधीने झाले. आपलं घर, आपली गल्ली,आपला गाव, आपले राज्य आणि आपला देश स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जगात यशस्वी झालेले राष्ट्र स्वच्छता संदर्भात प्रत्येक नागरिकांनी अतिशय दक्षता घेतली. “घाण करणार नाही आणि करू देणार नाही” या सूत्रा प्रमाणे प्रत्येकानी स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या श्रमदान कार्यक्रमात सहभागी झाले होते. महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या परिसरातील घाण, केरकचरा साफ करून परिसर स्वच्छ करण्यात यानिमित्ताने मोलाचा वाटा उचलला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र माळी, राष्ट्रीय योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. भागवत पस्तापुरे,
डॉ.बी.एल.घायाळ, डॉ.एन.के.वाघमारे, डॉ.शंकर विभुते, डॉ.एस.बी.मिर्झा, डॉ.आर.जी.मेटकर, डॉ.आर.जी.पवळे, डॉ.डी.बी.कदम, डॉ.एस.जी.तुगावकर, डॉ.व्ही.बी.मस्के, डॉ.एच.एस.मोहोकार,
डॉ .एल.टी.काळे,
डॉ.हनुमंत भोपाळे डॉ.जी.एस.भोपाळकर,
प्रा.आर.बी.पाटील, प्रा.अपस्तंभ,प्रा.जाकोरे, संजय कळगावकर, संजय एलसटवार, व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704