एम सी आर

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये २ ऑगस्टला भव्य शोभायात्रा विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण सत्कार सोहळा

Uncategorized

नांदेड, प्रतिनिधी : कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य शाखा, नांदेड यांच्या वतीने रविवार (दि. २ ऑगस्ट) रोजी नांदेड शहरात भव्य शोभायात्रा, गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा तसेच समाजरत्न, उद्योगरत्न, समाजभूषण आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जयंती उत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता आयटीआय चौक येथून भव्य शोभायात्रेने होणार असून श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर, राज कॉर्नर, चैतन्यनगर, साईबाबा मंदिर मार्गे श्रीकृष्ण मंगल कार्यालय, तरोडा (बु.) येथे शोभायात्रेचा समारोप होईल.

शोभायात्रेत संत गोरोबा काकांचा जिवंत देखावा, भजनी मंडळे, बँड पथके, लेझीम पथक, संतांच्या जीवनावरील प्रेरणादायी देखावे तसेच झेंडे-पताकांसह शेकडो समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे.

शोभायात्रेनंतर दुपारी १२ वाजता श्रीकृष्ण मंगल कार्यालय, तरोडा (बु.) येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शैक्षणिक, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच समाजाच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘समाजरत्न’, ‘उद्योगरत्न’, ‘समाजभूषण’ आणि ‘जीवनगौरव’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभेचे सदस्य तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून राज्यसभेचे सदस्य अजित गोपछडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेचे सदस्य अमरनाथ राजूरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय डी. पी. सावंत, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष विजयराव देवडे (लहानकर) राहणार आहेत.

नांदेड जिल्ह्यासह परिसरातील सर्व कुंभार समाज बांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव विभूते, जिल्हा सचिव धोंडीबा गोत्रम, मुख्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिरोळे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख बालाजीराव चक्रधर तसेच स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Share

Related posts

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

Chief Editor

नांदेड-किनवट मार्गावर भीषण अपघात : कार–दुचाकी समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

Chief Editor

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 मार्च रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलन

Chief Editor

यशवंत ‘ मधील एनसीसी कॅडेट्सची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

Chief Editor

निरोगी जीवनाचा मंत्र : योग

Chief Editor

विद्यापीठाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना अधिसभेच्या बैठकीत मंजुरी

Chief Editor

Leave a Comment