एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश

नांदेड:(दि.३१ जानेवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील उत्कृष्ट जलतरणपटू व समाजशास्त्र विभागाचे प्रा. ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना नॅशनल मास्टर्स गेम्स: २०२६ तर्फे मास्टर्स गेम्स असोसिएशन, महाराष्ट्र यांच्याद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरणीका, नाशिक येथे दि.३० जानेवारी रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत १०० मीटर बॅक स्ट्रोक स्पर्धेत सुवर्णपदक आणि ५० मीटर बॅक स्ट्रोक आणि फ्रीस्टाइल स्पर्धेत प्रत्येकी रौप्य पदक प्राप्त झाले आहे.
या दैदिप्यमान सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचा यथोचित सत्कार केला व आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
तसेच उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कबीर रबडे, पर्यवेक्षिका प्रा. वंदना बदने, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.एल.व्ही. पदमारानी राव, डॉ.साहेब शिंदे, प्रा.माधव दुधाटे, डॉ.वीरभद्र स्वामी, लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर, प्रा. नरेंद्र कंचटवार, डॉ. एकनाथ मिरकुटे, डॉ.मुकेश धर्मले, प्रा. सचिन अपस्तंभ, डॉ.भास्कर देशमुख, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, सेवानिवृत्त वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीरंग बोडके, प्रा. एम. एस. कुलकर्णी, प्रा. एस.डी. बोकारे, बालाजी गाडे, सेवानिवृत्त वन अधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर यांनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

सब-ज्युनिअर राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नांदेडच्या खेळाडूंची दमदार कामगिरी महाराष्ट्र संघाचा ओव्हरऑल चॅम्पियनशिपवर कब्जा

Chief Editor

मंत्रालयातील कथित कर्मचाऱ्यांचा आगळा-वेगळा प्रताप..! शासकीय नोकरीत असूनही पदाचा गैरवापर करून मानसिक त्रास; डॉ. निलेश बास्टेवाड यांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

Chief Editor

मालकाला सूचना न देता वृक्षतोड व नाली खोदकाम;मनपा अधिकाऱ्यांविरोधात आयुक्तांकडे तक्रार

Chief Editor

नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर संगीतम कवायतीचे संचलन

Chief Editor

आनंदा वैदिक मॅथ अकॅडमीचे राज्यस्तरीय सुयश

Chief Editor

डोळस व सक्षम नागरिक होण्यासाठी राज्यशास्त्र आवश्यक -डॉ. दत्ताजी मेहत्रे

Chief Editor

Leave a Comment