एम सी आर
Uncategorized

शिक्षण आणि पोलीस क्षेत्राच्या समन्वयातून सुरक्षितता* -सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डहाळे

नांदेड: (दि. ८ सप्टेंबर २०२६)

यशवंत महाविद्यालयात महिला सुधार व सुरक्षा समितीच्या वतीने माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नांदेड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा प्रभाकरराव डहाळे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी भूषविले

प्रारंभी प्रास्ताविक डॉ. मंगल कदम यांनी केले.

वर्षा प्रभाकरराव डहाळे यांनी मार्गदर्शनात, वास्तव जीवनाचे, समाजात घडलेले अनेक प्रसंग सांगत विद्यार्थिनींना तसेच महिला प्राध्यापिका आणि कर्मचाऱ्यांना देखील मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना वर्षा डहाळे म्हणाल्या की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थिनींनी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायला हवे. सोशल मीडियाचा वापर करून कोणीही त्रास देत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येतो. महाराष्ट्र सरकारने रॅगिंगसाठी सुद्धा कायदा केला आहे. विद्यार्थिनी आणि महिला जर अडचणीमध्ये असतील तर त्यांनी केव्हाही ११२ हा नंबर डायल करावा. महिलांच्या आपातकालीन मदतीसाठी व सेवेसाठी हा नंबर आहे. अभ्यासाच्या दिशेने आज विद्यार्थिनी न वळता आभासी दुनियत जास्त गर्क होत आहेत. सोशल मीडियाचे अनेक दुष्परिणाम वास्तव उदाहरणातून त्यांनी सांगितले तसेच उदाहरणे देत विद्यार्थिनींच्या अनेक प्रश्नांची उकल देखील केली.

अनेकदा कायद्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा केवळ भीतीपोटी सुद्धा महिलांद्वारे अन्यायाविरुद्ध आवाज उठविला जात नाही. महिलांना सुरक्षिततेबाबत हक्क, अधिकार, कायदा याचे महत्त्व सांगून कोणीही छेडछाड केली तर त्यावर कोणता कायदा आहे, कौटुंबिक हिंसाचाराबाबत काळजी घ्यावी, यासाठी पोलीस यंत्रणा कशी कार्यरत आहे, या गोष्टींचे सखोल मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन प्रा. राजश्री भोपाळे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप डॉ. कविता सोनकांबळे यांनी केला. शेवटी आभार डॉ. मीरा फड यांनी मानले.

याप्रसंगी विद्यार्थिनींच्या मोठ्या संख्येने उपस्थितीबरोबरच डॉ. संगीता शिंदे(ढेंगळे), डॉ. अर्चना गिरडे, डॉ. कविता केंद्रे, डॉ.मंगल कदम, डॉ. नीताराणी जैस्वाल, प्रा. प्रियंका सिसोदिया, प्रा. सोनाली वाकोडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व महिला कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तसेच प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, संदीप पाटील, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले .

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठात ‘प्रगत आण्विक जीवशास्त्र’ प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

Chief Editor

ओशो ध्यानधारणेने गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांना अयोध्या येथील त्रेतायुग फाउंडेशनचा ‘नॅशनल प्राईड अँड एक्सलन्स अवॉर्ड 2026’ जाहीर

Chief Editor

नियमांच्या चौकटीत माणुसकी जपणारा अधिकारी शेख सिकंदर अली

Chief Editor

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वारातीम विद्यापीठात वृक्षारोपण उपक्रम संपन्न

Chief Editor

Leave a Comment