एम सी आर

एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी किरण पडलवार यांची निवड

Uncategorized

नांदेड : विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी तसेच संघटनात्मक बांधणीसाठी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेले नांदेडचे झुंजार विद्यार्थी नेते किरण पडलवार यांची भारतीय राष्ट्रीय छात्र संघटना (NSUI) महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
किरण पडलवार यांनी गेल्या दहा वर्षांपासून एनएसयुआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय प्रश्नांसाठी अनेक आंदोलने, मोर्चे व निवेदने देत सातत्याने आवाज उठवला आहे. महाविद्यालयीन स्तरापासून ते जिल्हा पातळीपर्यंत संघटना बळकट करण्यात तसेच एनएसयुआय तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली,
एनएसयुआयचे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार आणि राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांच्या मान्यतेने, तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या स्वाक्षरीने किरण पडलवार यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
राज्यातील विद्यार्थी चळवळ अधिक सक्षम, आक्रमक व व्यापक करण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात असून, आगामी काळात महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावी लढा उभारण्याची जबाबदारी किरण पडलवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या निवडीनंतर किरण पडलवार यांच्यावर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“पक्षाने आणि संघटनेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून राज्यातील विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी प्रामाणिकपणे काम करेन,” अशी प्रतिक्रिया किरण पडलवार यांनी यावेळी व्यक्त केली.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल तसेच काँग्रेसच्या विविध सेलमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किरण पडलवार यांचे अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमातून;गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Chief Editor

सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ मनोहर चासकर

Chief Editor

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स आरोग्य सल्लागार मीरा धुळगुंडे नांदेड

Chief Editor

यशवंत ‘मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश

Chief Editor

रेणुका महोत्सव: ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि पौष्टिकतेचा उत्सव!

Chief Editor

स्वामी विवेकानंद संकुलात रक्तदान शिबिराचे आयोजन

Chief Editor

Leave a Comment