एम सी आर

क्रीडा स्पर्धा म्हणजे नव्या प्रतिभांना संधी मिळवून देणारे व्यासपीठ – श्री भैरवनाथ नायकवाडी

Uncategorized

नांदेड:
क्रीडा स्पर्धा म्हणजे नव्या प्रतिभांना संधी मिळवून देणारे व्यासपीठ असून यातून अनेक नव्या दमाचे खेळाडू आपली प्रतिभा सिद्ध करताना दिसत आहेत, असे प्रतिपादन नांदेडचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री भैरवनाथ नायकवाडी यांनी प्रतिभा निकेतन महाविद्यालयात अंतर महाविद्यालय क झोन बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुध्दिबळ स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी श्री.भैरवनाथ नायकवाडी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी नोकरी व खेळ यासंबंधी स्वतःचे अनुभव व्यक्त करून स्पर्धकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे प्रभारी क्रीडा संचालक व लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.दीपक वाघमारे यांनी केले.यावेळी त्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे महाविद्यालय वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन अनेक वर्षांपासून यशस्वीपणे करत आहे. क-झोनचा स्पर्धेचा शुभारंभ या स्पर्धेपासून होत आहे असे सांगितले. यावेळी क- झोनचे सचिव डॉ.महेश वाकरडकर, निवड समितीचे अध्यक्ष डॉ. चरणजीत सिंघ महाजन, उपप्राचार्य डॉ.दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात स्पर्धकांना शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर म्हणाले की,खेळात जय- पराजय महत्त्वाचा नसून पराजयातूनही भविष्यातील विजयासाठी महत्त्वाची प्रेरणा घेता येते, असे सांगून त्यांनी खेळाडू स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या उद्घाटकीय समारंभास कार्यालयीन समितीचे अध्यक्ष डॉ. मनोज पैंजणे, निवडसमितीचे सदस्य डॉ. बाबुराव घायाळ, स्पर्धेचे पंच डॉ. श्रावण नीळकंठ, श्री. सिद्धार्थ हटकर,डॉ. रविंद्र लाठकर, डॉ. संजय हापगुंडे, डॉ.संदीप शिंदे डॉ. गजानन वाघमारे, डॉ. श्रीमंत राऊत, डॉ. राहूल वरवंटीकर, डॉ. प्रवीण स्वामी, डॉ. राजेश्वर कुंटूरकर, डॉ. श्रीकांत केंद्रे व कार्यालयीन अधिक्षक श्री. राजेश अय्यंगार तसेच विविध महाविद्यालयातून आलेले क्रीडा संचालक व स्पर्धक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.सोपान पावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ममता देशमुख यांनी केले.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज व्याख्यान*

Chief Editor

मॉरिशस येथील सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी

Chief Editor

NEET पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राचार्या मनीषा हवालदार अटकेत

Chief Editor

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

नेसुबो महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी निवड

Chief Editor

Leave a Comment