एम सी आर
Uncategorized

मालकाला सूचना न देता वृक्षतोड व नाली खोदकाम;मनपा अधिकाऱ्यांविरोधात आयुक्तांकडे तक्रार

नांदेड: प्रतिनिधी
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे उपआयुक्त आणि बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली असर्जन गट क्रमांक १२३ मधील खासगी मालकीच्या जागेवर कोणतीही पूर्वसूचना न देता वृक्षतोड करण्यात आली तसेच नाली खोदण्यात आल्याचा आरोप संबंधित जमीनधारकांनी केला आहे. याबाबत मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मालकीच्या जागेवरील ४० वर्षांहून अधिक जुनी झाडे कोणतीही नोटीस किंवा पंचनामा न करता तोडण्यात आली. तसेच यापूर्वीही वायर फेन्सिंग व सिमेंटचे खांब तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी जागेची मोजणी, झाडांचे मूल्यांकन किंवा नुकसानभरपाईबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदारांनी मनपाकडे मागणी केली आहे की, तोडण्यात आलेल्या झाडांचे मूल्यांकन करून नुकसानभरपाई द्यावी, भविष्यात कोणतेही काम करण्यापूर्वी लेखी सूचना द्यावी आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी.
याशिवाय परिसरातील रस्ते, दुभाजक, विद्युत खांब आणि इतर सार्वजनिक कामांबाबतही भेदभाव होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणामुळे परिसरात नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Share

Related posts

वसंतराव नाईक महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात संपन्न…. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वार्थाने समतेचे पुरस्कर्ते* – डॉ.अजय गव्हाने

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय खगोलभौतिकी परिषद

Chief Editor

NEET पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राचार्या मनीषा हवालदार अटकेत

Chief Editor

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सांगडीतूनच ऊर्जा स्त्रोतांची पुनर्निर्मिती शक्य – प्रो. री-ची मुराकामी

Chief Editor

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

Chief Editor

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांनी केली -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

Leave a Comment