एम सी आर
Uncategorized

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

परभणी: दि१ऑगस्ट शनिवार २०२६

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी येथे 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

प्रत्येक नागरिकाने भारतीय राज्यघटनेने व मानवीय दृष्टिकोनातून घालून दिलेले आदर्श व कर्तव्य याची जाणीव ठेवत व्यवहार ठेवला तर भारताच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशकता येईल. यामुळेच टिळकांना अभिप्रेत असलेले स्वराज्य भारतात अवतरेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बी. ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु. शेख फातिमा यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्राची माहिती दिली, तर मराठी विभागातील डॉ. आशा गिरी लिखित अण्णाभाऊ कविता सादर करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन डॉ.महेश जाधव व आभार डॉ संगीता लोमटे यांनी मानले.

Share

Related posts

भगवान रजनीश कम्यूनमध्ये सक्रिय ध्यान अभियानास उत्साहात प्रारंभ

Chief Editor

जिजाऊंच्या संस्काराचा वसा आणि वारसा आजच्या मुलींनी घ्यावा: सुभाष ढगे

Chief Editor

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून धनगर समाजात शैक्षणिक चळवळीला बळ

Chief Editor

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने विद्यापीठात ‘पीएच.डी. एंड-टू-एंड’ सॉफ्टवेअर पोर्टलचा शुभारंभ

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठामार्फत स्वयम प्लॅटफॉर्मद्वारे पीएच.डी. कोर्सवर्कवर एकदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण

Chief Editor

लोकशाही आणि जातीव्यवस्था एकत्र नांदू शकत नाहीत -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

Leave a Comment