एम सी आर

स्वारातीम विद्यापीठामार्फत स्वयम प्लॅटफॉर्मद्वारे पीएच.डी. कोर्सवर्कवर एकदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण

Uncategorized

२४ जानेवारी रोजी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम; कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची प्रमुख उपस्थिती

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या गणितीयशास्त्र संकुल, स्वयम आणि मूक कोर्सेस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पीएम-उषा योजनेअंतर्गत “स्वयम प्लॅटफॉर्मद्वारे पीएच.डी. कोर्सवर्क” या विषयावर एकदिवसीय मोफत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने संपन्न होणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात साधन व्यक्ती म्हणून डॉ. रोहिदास नितोंडे, श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी, डॉ. रेणुका लोंढे, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि डॉ. आतिष तानगावडे, सांख्यिकी अधिकारी, पुणे हे सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रशिक्षणामध्ये स्वयम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पीएच.डी. कोर्सवर्क कसे पूर्ण करावे, स्वयमवर नोंदणी प्रक्रिया, संशोधन मार्गदर्शकांची भूमिका, स्वयम परीक्षा प्रक्रिया, श्रेयांक (क्रेडिट) हस्तांतरण आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम पूर्णतः मोफत असून नोंदणी केलेल्या सहभागींसाठी सहभागाची लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच सर्व सत्रांना उपस्थित राहणाऱ्या सहभागींस प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सविस्तर माहितीपत्रिका विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्वयम प्लॅटफॉर्मद्वारे पीएच.डी. कोर्सवर्क पूर्ण करण्यास इच्छुक सर्व पीएच.डी. विद्यार्थी तसेच त्यांचे संशोधन मार्गदर्शक यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गणितीयशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि आयोजन सचिव डॉ. नितीन श्रीधर दारकुंडे यांनी केले आहे.
——————————————————

Share

Related posts

यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचे उत्साह आणि थाटात उद्घाटन संपन्न

Chief Editor

२२ जानेवारी रोजी कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात बोलींचा जागर कार्यक्रमाचे आयोजन.

Chief Editor

विद्यार्थ्यांनी, अभ्यास चौकस बुद्धीने करावा’* ‘स्वारातीम’ विद्यापीठातील एकदिवसीय कार्यशाळेत डॉ. दायमा यांचे प्रतिपादन

Chief Editor

चढया दराने खताची विक्री केल्याने* *देगलूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये दि.३१ जानेवारी रोजी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन

Chief Editor

समाज कल्याण निरीक्षकांच्या पदोन्नतीची कोंडी दूर करण्याची मागणी नव्या आकृतीबंधातून दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सोडविण्याची अपेक्षा

Chief Editor

Leave a Comment