एम सी आर

न्यायालयीन आदेशांच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी उद्या पासून आमरण उपोषण

Uncategorized

पूर्वसूचना देऊनही ठोस कार्यवाही न झाल्याने नऊ न्यायप्रविष्ट कर्मचाऱ्यांचा निर्णय
नांदेड प्रतिनिधी
मा. औद्योगिक न्यायालय, जालना तसेच मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी दिलेल्या न्यायालयीन आदेशांची संपूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील नऊ न्यायप्रविष्ट कर्मचारी दि. १४ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत.

या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांनी दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठ प्रशासनास आमरण उपोषणाची पूर्वसूचना दिली होती. न्यायालयीन आदेशांची संपूर्ण अंमलबजावणी करावी, संबंधित कर्मचाऱ्यांना आदेशानुसार देय असलेले नियमित वेतन, थकीत वेतन, आर्थिक लाभ, सेवा विषयक लाभ व इतर परिणामी लाभ देण्यात यावेत, अशी मागणी या पूर्वसूचनेद्वारे करण्यात आली होती. मात्र, पूर्वसूचना देऊनही मागण्यांवर ठोस व समाधानकारक कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांनी केला आहे.

न्यायालयीन आदेशांच्या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाकडून काही प्रमाणात कार्यवाही करण्यात आली असली, तरी आदेशातील सर्व निर्देशांची अद्याप संपूर्ण व प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयीन आदेशाचा प्रत्यक्ष लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना मिळावा आणि आदेशातील प्रलंबित बाबींची पूर्तता तातडीने व्हावी, या मागणीसाठी आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आंदोलनामध्ये आनंदा गंगारामजी हंबर्डे हे प्रत्यक्ष आमरण उपोषणास बसणार असून, अन्य आठ न्यायप्रविष्ट कर्मचारी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी उपस्थित राहणार आहेत. हे उपोषण विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कॉर्नरच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

संबंधित कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरुद्ध अथवा वैयक्तिक स्वरूपाचे नसून, मा. न्यायालयाच्या आदेशांचा सन्मान राखून त्यांची संपूर्ण, प्रभावी व कालबद्ध अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी करण्यात येत आहे. प्रशासनाने न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, न्यायालयीन आदेशांची संपूर्ण अंमलबजावणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांचे कायदेशीर हक्क व देय लाभ मिळाल्यास या प्रश्नाची योग्य ती सोडवणूक होऊ शकते, अशी अपेक्षा संबंधित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आमरण उपोषणकर्ते :

आनंदा गंगारामजी हंबर्डे.

उपोषणास पाठिंबा देणारे न्यायप्रविष्ट कर्मचारी :

रानोजी हंबर्डे, प्रदीप भोसले, साईनाथ मामीडवार, सुशील खरवडकर, सुरेश मोरे, दासराव हंबर्डे, गोविंद हंबर्डे आणि किशोर हंबर्डे.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठात ‘ताणतणाव व्यवस्थापन’ विषयावर विशेष व्याख्यान. संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

विद्यापीठ आणि मनपा यांच्या समन्वयाने शहराचा कायापालट करता येईल– कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांचे आवाहन

Chief Editor

आदर्श उपक्रम: सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा** *विविध ठिकाणी वृक्षारोपण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा*

Chief Editor

ओशो ध्यान प्रयोगांद्वारे शांती, मौन, आनंदाची अनुभूती -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

प्रतिक्षा बिरादार हिची विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव पदी निवड

Chief Editor

Leave a Comment