एम सी आर
Uncategorized

आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टविरोधात पत्रकारांची कंधार पोलीस ठाण्यात तक्रार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (नरसिंग पेठकर)

राजीव केंद्रे वाहक कंधार आगार यांनी समाजमाध्यमांवर पत्रकारांविषयी कथित आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट केल्याचा आरोप करत पत्रकारांनी गुरुवारी कंधार पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. संबंधित पोस्टमुळे पत्रकारांची प्रतिमा मलिन होत असून समाजात पत्रकारांविषयी द्वेषाची भावना निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच राजीव केंद्रे यांच्या सोशल मीडिया खात्यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी पत्रकार राजरत्न गायकवाड, मयूर कांबळे, ज्ञानेश्वर कागणे, रमेशसिंग ठाकूर, संतोष सोमासे, शुभम केंद्रे, संभाजी कांबळे तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनची टीम उपस्थित होती.

Share

Related posts

महिला दिना निमित्त राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते भित्तिपत्रका चे विमोचन

Chief Editor

रोलर रिलेमध्ये सर्वोदय स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

Chief Editor

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त सुरुवात

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये आरोग्यविषयक जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

शिक्षणावर खर्च न केल्यास तुरुंगावर करावा लागेल -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दाताळा कंधार तालुक्यात प्रथम

Chief Editor

Leave a Comment