एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये आरोग्यविषयक जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

नांदेड:(दि.९ एप्रिल २०२६)
श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक आरोग्य दिनानिमित्त दि.८ एप्रिल रोजी आरोग्यविषयक जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शिका जागतिक आरोग्य सल्लागार डॉ.मनीषा जायभाये यांनी हेल्थ फिटनेस सल्ला, व्यायाम आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना, आधुनिक धकाधकीच्या व ताणतणावाच्या युगात आरोग्याकडे लक्ष देणे, ही प्रत्येकाची प्राथमिक जबाबदारी आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तीनही आरोग्याची जपणूक करणे; अत्यंत गरजेचे आहे. भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री. नरेंद्र मोदी यांनी, डॉक्टरांकडे नाही; तर वेलनेस कोचकडे जा, असा सल्ला दिलेला आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी जवळचे नातेसंबंध, जीवनशैली आणि ताणतणावापासून मुक्त जीवन जगले पाहिजे. आजच्या काळातील स्त्री पूर्ण कुटुंबाची काळजी घेते; पण स्वतःची काळजी घेत नाही, ही चिंताजनक बाब आहे. प्रत्येकाचे डायट म्हणजेच आहार चांगला असावा तसेच नित्य व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. आज आपल्या शेतीचे आरोग्य बिघडल्यामुळे आपले देखील आरोग्य बिघडले आहे. आपल्याला पाणी सुद्धा शुद्ध मिळत नाही; केमिकलयुक्त पाणी आपण पीत असतो. अशा काळात वयोमानानुसार व आजारानुसार वेळोवेळी शरीराच्या विविध तपासण्या करणे आणि दिनचर्या आरोग्यमय ठेवणे आवश्यक आहे.
या कार्यशाळेत डॉ.एल.व्ही. पद्माराणी राव, डॉ.नीताराणी जैस्वाल, ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.हनुमंतलू तमलुरकर, प्रा.राजश्री भोपाळे, डॉ. कैलास इंगोले, डॉ.दीप्ती तोटावार, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ.साईनाथ बिंदगे यांच्यासह इतरही प्राध्यापकवृंदांनी सक्रिय सहभाग घेतला. शेवटी प्रत्येक उपस्थितांचे वजन, उंची, रक्तदाब आणि इतर आरोग्यविषयक चाचण्या देखील घेण्यात आल्या.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, विठ्ठल सुरनर, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.

Share

Related posts

हनुमान पेठ, नांदेड-भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक सुमित मुथा यांची निवड.

Chief Editor

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोज

Chief Editor

तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ गेले पाहिजे : ना. हेमंत पाटील

Chief Editor

ग्रामीण मातंग स्त्री ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार

Chief Editor

नांदेड SBI सोनेतारण घोटाळ्यातील मुख्य आरोपी आदित्य सेनगावकरचा राजस्थानमध्ये गूढ मृत्यू

Chief Editor

आकाशा गावकवाड मृत्यू प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला १ कोटींची मदत देण्याची मागणी

Chief Editor

Leave a Comment