एम सी आर
Uncategorized

पुस्तकप्रेमाकडून पुस्तक वेडाकडे नेणारा उपक्रम: यशवंत बिब्लियोफाइल्स!

नांदेड :

‘रविवारची प्रसन्न सकाळ.चोहोबाजूंनी पसरलेली हिरवळ. पार्श्वभूमीला शास्त्रीय संगीताचे सूर निनादत आहेत.काही विद्यार्थी चित्र काढताहेत तर काही रेखाचित्रे रेखाटताहेत आणि अशा मोहक वातावरणात गुलाबी थंडीत कोवळे ऊन अंगावर घेत विद्यार्थी पुस्तकांच्या वाचनात रममाण झालेले आहेत…’ शहराच्या मध्यवर्ती भागातील यशवंत महाविद्यालयातील हे दृश्य पाहून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हेही भारावून गेले. निमित्त होते ‘यशवंत बिब्लियोफाइल्स’च्या तिसऱ्या पर्वाचे.

उपक्रमशील अध्यापक डॉ.विश्वाधार देशमुख यांच्या संकल्पना-समन्वयातून मोबाईलला काही काळापुरती सुट्टी देऊन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्रित वाचन करण्याच्या कल्पनेतून आकाराला आलेला उपक्रम म्हणजे ‘यशवंत बिब्लियोफाइल्स.’
सप्टेंबर २०२५ मध्ये सुरु झालेल्या या उपक्रमाचे हे तिसरे पर्व. या पर्वासाठी पुस्तकप्रेमी अशी ओळख असलेले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. याशिवाय प्रसिद्ध कवी व्यंकटेश चौधरी, डॉ. विजय भोसले,प्रा.गजानन हुंडे आणि प्रा. माधव पुयेड यांची विशेष उपस्थिती होती.

पुस्तक प्रेमाकडून पुस्तक वेडाकडे नेणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करताना राहुल कर्डिले म्हणाले की, ‘वाचन हा आत्मशोधाचा उत्तम मार्ग आहे. विविध समाज माध्यमे ही आपणाला माहिती देतात,पण ती ज्ञान देऊ शकत नाहीत.वाचनातून ज्ञानाचा मार्ग प्रशस्त होतो.त्यातून माणूस खऱ्या अर्थाने घडतो,त्याला त्याची ओळख सापडते.यामुळे तरुण वयात आपण पुस्तकांचे बोट घट्ट धरून त्यातून दिग्दर्शित केलेली ‘सुंदर दुनियेची’ सफर पूर्ण करायला हवी.या दृष्टीने ‘बिब्लियोफाईल्स’चा हा उपक्रम महत्त्वाचा असून महिन्यातून एक रविवार असे न करता प्रत्येक रविवारी तो आयोजित व्हायला हवा,’अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करुन वाचन कट्ट्याच्या मागील सहा वर्षांपासून चालणाऱ्या विविध उपक्रमांचा थोडक्यात परिचय करून दिला.

यशवंत बिब्लियोफाइल्स’ हा दिशादर्शक उपक्रम असून अशा उपक्रमांची संख्या वाढावी तसेच यातून विद्यार्थ्यांमधील वाचनाची आवड वृद्धिंगत करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील सर्व प्राचार्य तथा मुख्याध्यापक यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याचा मनोदय याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बोलून दाखवला.

समन्वयक डॉ.विश्वाधार देशमुख यांनी उपक्रमात सहभागी मान्यवर,पालक, माजी विद्यार्थी तसेच कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील जवळपास सत्तर विद्यार्थी यांचे आभार मानले.पूजा तोटेवाड यांनी सूत्रसंचालन तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर ‘कला कट्ट्या’ने बनवलेले विशेष बुकमार्क जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रत्येक वाचकाला देण्यात आले. शेवटी ‘बिब्लियोफाइल्स’च्या सेल्फी पॉईंटवर फोटो काढून अभिप्राय नोंदवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ‘वाचन कट्टा माय मराठी मंडळा’चे अध्यक्ष शुभम राठोड, यशवंत बिब्लियोफाइल्सच्या हिंदवी जाधव,पूनम भोसले,’कला कट्ट्या’च्या शिवानी कार्लेकर, जर्मिन शेख, गौरी शिंदे,स्नेहा गायकवाड, ‘कर्तव्य कट्ट्या’च्या गोदावरी कानशुक्ले,कृष्णा गव्हाणे, सृजन गित्ते, अदिती भालेराव,दुर्गा देशमुख,राधा कराड, पवन टाकणखार,’कवी कट्ट्या’चे आयुष सोनकांबळे,मयूर धुतुरे, अंजली मद्रेवार, सचिन तेलंग,विश्वजित परमार,पल्लवी रागेवार, शिवानी क्षीरसागर अशा अनेकानेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Share

Related posts

आकाशा गावकवाड मृत्यू प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला १ कोटींची मदत देण्याची मागणी

Chief Editor

यशवंत ‘ मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राज्यस्तरीय सुयश

Chief Editor

म.ज्योतिबा फुले हे महान क्रांतिकारक समाज सुधारक होते – प्रा. राहुल पुंडगे

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवात पोस्टर सादरीकरण उत्साहात संपन्न

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठातील चंपत हंबर्डे यांचे निधन; विद्यापीठात श्रद्धांजली सभा

Chief Editor

डॉ.अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवाद आणि संविधानवादाचे सुरेख मिश्रण -डॉ. बी. एस. वाघमारे

Chief Editor

Leave a Comment