एम सी आर

यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Uncategorized

नांदेड : येथील येथे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी “डिजिटायझिंग केअर अँड डॉक्युमेंटिंग ग्रोथ: मेंटॉरशिप थ्रू YLMS” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यशाळेतील तांत्रिक सत्रांमध्ये सहभागी प्राध्यापकांना Yeshwant Learning Management System (YLMS) या डिजिटल प्रणालीचा सैद्धांतिक तसेच प्रायोगिक परिचय करून देण्यात आला. पहिल्या तांत्रिक सत्रात संगणकशास्त्र व आयटी विभागाचे डॉ. प्रवीण तामसेकर यांनी मेंटॉर–मेंटी योजनेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी डिजिटल नोंद व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी YLMS च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रभावी परीक्षण आणि नोंदी व्यवस्थापन कसे करता येते याचे सविस्तर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या तांत्रिक सत्रात विभागप्रमुख डॉ. श्रीकांत जाधव यांनी YLMS प्रणालीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करत प्रशिक्षण दिले. सहभागी प्राध्यापकांनी मेंटॉर–मेंटी नोंदी भरणे, प्रगती अहवाल तयार करणे आणि डिजिटल डॉक्युमेंटेशनची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली. प्रश्नोत्तर सत्रादरम्यान उपस्थितांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.

या कार्यशाळेत एकूण ७४ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला. डिजिटल मेंटॉरिंग, पारदर्शक नोंद व्यवस्थापन आणि पेपरलेस प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.

Share

Related posts

आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा (डी-झोन) २०२६–२७ वार्षिक नियोजन बैठक संपन्न

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दाताळा कंधार तालुक्यात प्रथम

Chief Editor

मा. विजयराव जामकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणातून हरित महाविद्यालयाचा संकल्प.कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी

Chief Editor

तळागाळातील उपेक्षितांना न्याय मिळालाच पाहिजे”

Chief Editor

यशवंत’मधील संशोधक भारत कदम यांना पीएच.डी. प्राप्त

Chief Editor

अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये ९ ऑगस्ट रोजी अनुसूचित जातीतील ५९ जातीचा महामोर्चा

Chief Editor

Leave a Comment