एम सी आर

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Uncategorized

नांदेड : (प्रतिनिधी ) कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी व देवांश एज्युटेक यांच्या संयुक्त विद्यमाने बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. 07 जानेवारी 2026 रोजी सकाळी 09 ते 11 या वेळेत करण्यात आले आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून देवांश एज्युटेक चे संचालक माधव शर्मा व TCS, Accenture या कंपनीमध्ये डेटा सायंटिस्ट या पदावर कार्यरत राहिलेले श्रेयश औंढेकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत खालील विषयावर माहिती देण्यात येणार आहे.  Data Science व AI या विषयावरील करिअर संधी  Data Science व AI वरील सर्व बेसिक व ऍडव्हान्स माहितीही कार्यशाळा BCA,BCS,MSC,MCA व B.SC (IT) मधील परभणी शहरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. तेव्हा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी केले आहे.या कार्यशाळेसाठी प्रा.निकिता कुलकर्णी – 9730630065 व प्रा.कांचन शर्मा- 9975299268 यांच्याशी संपर्क साधावा.

Share

Related posts

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा*

Chief Editor

नांदेडमध्ये अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ५.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गुजरातमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Chief Editor

बौद्ध समाजातील महिलांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य; लक्ष्मण ढोबळेंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

Chief Editor

संपलाही नाही संपणार नाही माझ्या भिमाचा दरारा* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते डॉ. शिवराज शिंदे यांच्या भीम गीताचे विमोचन

Chief Editor

Leave a Comment