एम सी आर

मा. विजयराव जामकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणातून हरित महाविद्यालयाचा संकल्प.कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी

Uncategorized

परभणी
नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव मा. विजयराव जामकर यांच्या वाढदिवसानिमित महिला महाविद्यालय येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.
झाडे ही केवळ पर्यावरणाचे रक्षण करणारी नव्हेत, तर भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध भविष्याची अमूल्य ठेव आहेत. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणाऱ्या विचारांना बळ देत, प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करणे, हेच प्रत्येक विद्यार्थिनीचे उद्दिष्ट असले पाहिजे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या संचालिका मा. सौ. सोनियाताई जामकर, संचालक मा. श्री. गोविंदराव नांदापूरकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. महेश जाधव, डॉ. संगीता लोमटे, डॉ. ओमप्रभा लोहकरे, डॉ. पल्लवी कुलकर्णी, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अभिजीत सरनाईक, करियर कट्टा समन्वयक डॉ. गणेश जाधव तसेच कु. मधुरा फुटाणे, श्रुती वझे, हर्षिका शहाणे, फातिमा शेख, निकीता पठाडे, श्रुती जाधव, मोहिनी शेळके ह्या विद्यार्थिनी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थी हिताला प्राधान्य: एमएच-सीईटीमुळे हुकलेल्या परीक्षा पुन्हा घेणार

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

आम्ही वारकरी परिवाराकडून संपूर्ण महाराष्ट्रात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन..

Chief Editor

वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमातून;गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Chief Editor

विकसित भारत २०४७ : आत्मनिर्भरतेतून महासत्तेकडे वाटचाल शक्य” – प्रा. डॉ. सुभाष पाटील

Chief Editor

हायड्रेट हर्बलाइफ: उन्हाळ्यातील ताजगीसाठी

Chief Editor

Leave a Comment