https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्राईम

गडचिरोली येथे पोलीस नक्षल चकमकीत तीन नक्षल ठार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील केडमारा येथील जंगलात पोलीस नक्षल चकमकीत तीन नक्षल ठार झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे नक्षल चळवळीला हादरा बसला आहे. यात पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी सह दोन नक्षलवादी या चकमकीत मारले गेले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पेरिमिली आणि अहेरी दलम हे माने राजाराम ते पेरिमिली सशस्त्र चौकी दरम्यान केडमारा येथील जंगल परिसरात तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. या  मिळालेल्या माहितीच्या आधारे जंगल परिसरात शोध मोहीम राबवण्यासाठी प्राणहिता येथून दोन सी 60 पथक पाठविण्यात आले.या जंगल परिसरात विशेष  शोध मोहीम सुरू असताना, नक्षलवाद्यांनी सी -६० जवानावर  गोळीबार केला हा गोळीबार संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलि आहे.

गोळीबारानंतर घटनास्थळी  शोध मोहिमेदरम्यान शस्त्रे आणि इतर साहित्यासह तीन पुरुष नक्षलवादी मृतदेह सापडले आहेत. यात पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी यांचा एक मृतदेह आणि इतर दोन मृतदेह पेरिमिली दलमच्या वासू आणि अहेरी दलमच्या श्रीकांत यांचे असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की वासू यांना पेरिमिली एलओएसच्या 2023 मध्ये डीव्हीसीएम पदावर आणि श्रीकांत यांना उपपदावर पदोन्नती देण्यात आली होती. अहेरी LOS चे कमांडर ज्याची ओळख पोलीसाकडून केली जात आहे.

बिटलू मडावी हा यावर्षी 9 मार्च रोजी विद्यार्थी साईनाथ नरोटे यांच्या हत्येसह फेब्रुवारी/मार्च 2023 मध्ये विसामुंडी आणि आलेंगा येथे रस्ते बांधकाम उपकरणांची जाळपोळ करण्याच्या दोन घटनांमध्ये मुख्य आरोपी होता.हे विशेष .

परिसरात आताही सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704