एम सी आर

तांत्रिक कौशल्य ही काळाची गरज – डॉ. सचिन नरंगले

Uncategorized

नांदेड:( दि. २४ ऑगस्ट २०२६)
यशवंत महाविद्यालयात संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार संगणकशास्त्र विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन आले होते.
याप्रसंगी विचारमंचावर कार्यकामाचे अध्यक्ष माजी विभागप्रमुख डॉ.प्रदीप पाठक व विद्यमान विभागप्रमुख डॉ. श्रीकांत जाधव, प्रमुख अतिथी डॉ. सचिन नरंगले, डॉ.प्रवीण तामसेकर उपस्थित होते.
प्रारंभी आशिष आऊलवार व वेदिका पलेवाड यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. तसेच राजवीर मननं या विद्यार्थ्याने कॉलेजबद्दल मनोगत व्यक्त केले.
डॉ. सचिन नरंगले यांनी, संगणक क्षेत्रातील विविध नौकरी व त्यासाठी आवश्यक असणारे सर्व तांत्रिक कोर्सेस तसेच आजचा विद्यार्थी हा संगणकाच्या युगातील सर्वात उंच उडी मारणारा असून त्यास या सर्व गोष्टींचे अतिशय काळजीपूर्वक जाणीव व दखल घेतली पाहिजे. जेणेकरून भविष्यात आयटी कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. आजच्या युगात फक्त संगणकाचे शिक्षण घेऊन किंवा संगणकाविषयी माहिती असून उपयोगी नाही; तर आजचे जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे जात असून त्याची सुद्धा परिपूर्ण माहिती असणे तितकेच गरजेचे ठरत आहे.
डॉ.श्रीकांत जाधव यांनी विभागातील विविध उपक्रमाची माहिती दिली.
सूत्रसंचालन रुद्र साबणे यांनी केले व आभार कु समिक्षा लोणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सीमा शिंदे, प्रा. गुरुप्रसाद चौसटे, प्रा. चेतन देशमुख, प्रा. निकिता बागल, प्रा. दुर्गेश चव्हाण, प्रा. वैशाली पवार, सुनीता भालके, बळवंत शिंदे यांनी परिश्रम घेतले तसेच प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

एमजीएम महाविद्यालयाच्या ५०० विद्यार्थ्यांची आयलाईक (iLIKE) कोर्सेस साठी नोंदणी प्रा अजित तुकाराम भोसले यांचा उत्कृष्ट प्राध्यापक समन्वयक म्हणून गौरव

Chief Editor

यशवंत महाविद्यालयात समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे थाटात उद्घाटन

Chief Editor

शिबिरार्थी डॉ.अजय गव्हाणे संचालित ध्यानप्रयोगांनी ध्यानमग्न

Chief Editor

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चार चिमुकल्यांचा बळी; कुटुंबीयांना २० लाख मदत द्या — डॉ. मुजाहिद खान

Chief Editor

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

Leave a Comment